बावधन येथे खाण खडी क्रशरला शेतकरी एकजुटीने विरोध

हजारो शेतकरी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक
Bavdhan Stone Crusher Protest, farmer, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (शुभम कोदे)
छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेसाठी स्वतःच आयुष्य पणाला लावलं.शेतकऱ्यांच्या गावाची काडी कोण सावकाराकडे गहाण पडू देणार नाही,असा एल्गार त्यावेळी महाराजांनी केला.परंतु त्यांचे वंशज असलेले खासदार उदयनराजे भोसले मात्र आज हजारो शेतकरी,ग्रामस्थ,वयोवृद्ध गृहस्थ लहान मुले यांच्या जीवाशी आणि त्यांची पुढील भविष्याची कोणतीही पर्वा न करता खाण क्रशर चालू करणार आहेत. हे छत्रपतींची शिवाजी महाराजांचे वंशज असू शकत नाहीत,हे जनतेच्या जीवावर उठलेले आहेत अशा खासदारांचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि जर खाण क्रशन  झाल्यास आम्ही सर्व शेतकरी ग्रामस्थ मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचे ग्रामस्थानी सांगितले. खाण क्रशर विरोधी बावधन चावडी या ठिकाणी झालेल्या निषेध सभेमध्ये शेतकरी बोलत होते.

यावेळी बावधन,नागेवाडी, दरेवाडी, कणुर, अनपटवाडी, म्हातेकर वाडी, वाघजाई वाडी, पांढरेची वाडी, शेलारवाडी, व्याजवाडी या ठिकाणचे अनेक शेतकरी,महिला,लहान मुले अशी सुमारे दोन ते अडीच हजार ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.यावेळी अनेक शेतकरी,महिला,विद्यार्थी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी बोलताना,मागील २०२२ मध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावे असणारी जमीन लगतच्या मालकी हक्क असणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता  चुकीच्या पद्धतीने मोजण्यात आली.त्यानंतर बावधन, अनपटवाडी,वाघजाई वाडी,या ग्रामपंचायतीचे खाण क्रशन विरोधी ग्रामसभेचे ठराव देऊन सुद्धा,त्या संदर्भातील काही समाज कंठकानी त्या ठिकाणीची प्रशासनाला खोटी आणि बोगस कागदपत्रे देऊन खाण क्रशर चालू करण्याची परवानगी घेण्यात आली.ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आली असतात येथील काही शेतकऱ्यांनी पुणे येथील मोजणी खात्यातील आयुक्त कार्यालय अजून ही मोजणी चुकीच्या पद्धतीने झाली असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर २०२४ रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये ग्रामस्थांचा विरोध असल्यास खान चालू करणार नाही असा शब्द खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला,परंतु निवडणुकीनंतर हा शब्द डावलून त्या ठिकाणी पुन्हा खाण करण्यावर खासदार उदयनराजे भोसले ठाम असल्याचे यावेळी ग्रामस्थानी सांगितले.

या विरोधात मागील दहा दिवसांपासून भागातील काही तरुण शेतकरी वाई तहसील कार्यालयात या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसले असून,दिवसेंदिवस त्यांनी प्रकृती खालावत चालली आहे.असे असताना अद्याप प्रशासनाने त्यांची  कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही.या संदर्भात चर्चा करण्यासाठी भागातील शिष्ठ मंडळ खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे गेले असतात,त्या ठिकाणी ग्रामस्थांना दुय्यम वागणूक देऊन कोणतीही समाधानकारक तोडगा निघाला नसल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल तीव्र विरोध निर्माण झाला आहे.असे देखील यावेळी सांगण्यात आले. 

खाण क्रशर चालू झाल्यास पुण्याचे पाणी,शेतीचे पाणी, रस्ते, जमिनीची सुपीकता, वाहतूक, शेतकऱ्याचे उत्पन्न इत्यादीच्या अनेक समस्या निर्माण होणार आहेत.त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारे खान क्रशर होऊ द्यायचं नाही यावर ग्रामस्थांची भूमिका ठाम असल्याचे दिसून येत आहे. जर खासदार उदयनराजे भोसले यांनी खाण क्रशन चालू करण्यास परवानगी दिली तर आम्ही संपूर्ण कुटुंबासमवेत मुंबई मंत्रालयाबाहेत आमरण उपोषण करणार असल्याचे ग्रामस्थानी भाषणात सांगितले.
बावधनमधील या ऐतिहासिक सभेने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला असून, गावाच्या अस्तित्वासाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

-----------------

Sudhakar pant paricharak, anniversary, shivshahi new, advertise,

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------


Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !