आदर्श पतसंस्थेने गाठला २९ कोटी ठेवींचा टप्पा

आधुनिक बँकिंग सुविधांसह सभासदांच्या विश्वासाला प्राधान्य - अध्यक्ष डॉ. लक्ष्मण वन्नम
Adarsh ​​Credit Society: ₹29 Crore in Deposits, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा सातारा, (शुभम कोदे)
वाई - आदर्श सहकारी पतसंस्थेने आपल्या प्रगतीचा आलेख उंचावत २९ कोटी रुपयांच्या ठेवींचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला असून, आतापर्यंत सभासदांना सुमारे २४ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. सभासदांचा वाढता विश्वास हीच संस्थेच्या प्रगतीची खरी पावती असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण जनार्दन वन्नम यांनी सांगितले.

आदर्श सहकारी पतसंस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी कृष्णाबाई संस्थान, भिमकुंड आळी, वाई येथे उत्साहात पार पडली. यावेळी संस्थेच्या आर्थिक व व्यावसायिक प्रगतीचा आढावा देताना डॉ. वन्नम यांनी ही माहिती दिली.

गरजू तसेच सक्षम सभासदांना व्यवसायवाढीसाठी तत्परतेने कर्ज उपलब्ध करून देणारी संस्था म्हणून आदर्श पतसंस्थेने आपली ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजांना आधार देणारी ‘अर्थवाहिनी’ म्हणून संस्थेचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. आधुनिक बँकिंगच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन संस्थेने क्यूआर कोड, आरटीजीएस, एनईएफटी ट्रान्सफर, मोबाईल बँकिंग यांसारख्या आधुनिक सुविधा खातेदारांना उपलब्ध करून दिल्या आहेत. सहकार विभागाच्या नियमांचे पालन करत पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने कामकाज सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. संस्थेचे कर्जदार नियमितपणे कर्जाची परतफेड करीत असल्याने पतसंस्थेच्या व्यवसायाचा आलेख सातत्याने उंचावत असल्याचे चित्र आहे.

सभेतील विविध विषयांवरील सभासदांच्या प्रश्नांना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबुराव देशमुख यांनी उत्तरे दिली. आर्थिक पत्रकाचे वाचन उपव्यवस्थापक विठ्ठल गुळूमकर यांनी केले. कर्जविषयक माहिती कर्ज अधीक्षक चेतन गोरे, तर विकासविषयक माहिती विकास अधिकारी यशवंत वाडकर यांनी दिली. उपाध्यक्ष संदीप धनवे यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे संचालक संतोष सणस, सुहास पाटणे, गोरखनाथ खैरे, कैलास परदेशी, सविता देशमुख, ॲड. सुनीता गोरे, सोनाली वाडकर यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

सभा यशस्वी करण्यासाठी विक्रांत खैरे, अतुल पवार, प्रशांत फडतरे, देवेंद्र जमदाडे, केतकी मांढरे, प्रसन्न येवले, महेंद्र धुमाळ, प्रार्थना गाडे, प्रदीप सोनवणे तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !