अरण गावाच्या हद्दीत कार दोन वेळा पलटी
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (वैभव कुलकर्णी)
पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अरण गावाच्या हद्दीत भारत पेट्रोल पंपाजवळील हॉटेल निसर्ग परिसरात शुक्रवारी (दि. २१ ऑगस्ट) दुपारी सुमारास भरधाव स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील सुमित सुनील बिनगे (वय १९) आणि प्रथमेश दत्तात्रेय बिनगे (वय २०) हे दोघे गंभीर जखमी झाले असून कारचालक समर्थ सतीश साळुंके (वय २२) हा किरकोळ जखमी झाला आहे. तिघेही मोडनिंब (ता. माढा, जि. सोलापूर) येथील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोडनिंब येथून टेंभुर्णीकडे स्विफ्ट कार (क्र. MH 12 RF 3516) भरधाव वेगाने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत जाऊन तब्बल दोन वेळा पलटी झाली. अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील गस्ती पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेतून डॉ. प्रशांत कारंजकर आणि रुग्णवाहिका चालक बंडू गायकवाड यांच्या मदतीने पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती वरवडे टोलनाका गस्ती पथकाचे प्रमुख संतोष खडके यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्याच्या अपघात विभागाचे अधिकारी जगताप तसेच मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे अधिकारी किरण आवताडे (PSI) यांना दिली आहे.
भरधाव वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले असून, अपघाताबाबत पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























