नातेपुते पोलीस स्टेशनमध्ये १२ जणांवर गुन्हा दाखल
शिवशाही वृत्तसेवा, माळशिरस (वैभव कुलकर्णी)
माळशिरस तालुक्यातील मोरोची येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर ‘तिरट’ जुगार अड्ड्यावर नातेपुते पोलिसांनी रविवारी (दि. २३ ऑगस्ट) दुपारी धडक कारवाई केली. पोलिसांच्या या छाप्यात जुगार खेळणाऱ्या १२ जणांवर महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळावरून सात मोटारसायकलींसह एकूण १ लाख ४२ हजार ५४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरोची येथे रविवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास ‘तिरट’ जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. या कारवाईत सात मोटारसायकली, रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, वही व पेन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी हनुमंत बाळू कर्च, रामचंद्र दगडू कर्च, नानासाहेब शामराव सुळ, शंकर बाळू कर्च (पैलवान), किसन बाबा कर्च (रा. पिंपरी), रवींद्र राजेंद्र झेंडे, विष्णू शंकर सुळ, विजय मोहन सुळ, सुनील दादा झेंडे, अंकुश दादासो खिलारे, जगन्नाथ ज्ञानदेव पानसकर आणि अण्णा धोंडिबा गोरे (सर्व रा. मोरोची, ता. माळशिरस) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जावेद जमादार, पोलीस नाईक अमोल वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रतीक पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल असलम शेख यांच्या पथकाने केली.
मोरोची परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर झालेल्या या कारवाईमुळे बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांच्या पुढील कारवाईकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























