नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल, पोलिसांकडून तपास सुरू
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई एमआयडीसी परिसरातील अर्थफाउंड्री कंपनीमध्ये काम करणाऱ्या झारखंड येथील ४२ वर्षीय कामगाराने शनिवारी सकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास फाउंड्रीतील धातू वितळविण्याच्या भट्टीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या दुर्दैवी घटनेत गंभीर भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
मृताचे नाव दुर्गा रोहिदास प्रधान (वय ४२) असे असून तो मूळचा राजाबासा, ता. टेटांगार, जि. सिंदेगा, झारखंड येथील रहिवासी होता. सध्या तो वाई एमआयडीसी परिसरातील अनपटवस्ती येथे वास्तव्यास होता.
घटनेची माहिती मिळताच सहकारी कामगारांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र भट्टीतील तीव्र उष्णतेमुळे त्याच्या शरीराचा खालचा भाग गंभीररीत्या भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
मृतदेह ग्रामीण रुग्णालय, वाई येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने पाहणी केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



