लायन्स क्लब ऑफ पंढरपूर ड्रीमच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (मनिषा कुलकर्णी)
द लायन्स क्लब ऑफ पंढरपूर ड्रीमच्या अध्यक्षपदी बांधकाम व्यावसायिक शार्दूल नलबिलवार, तर सचिवपदी संध्या खिस्ते यांची निवड करण्यात आली. खजिनदारपदी गणेश यलमार पाटील यांची निवड करण्यात आली. प्रथम उपाध्यक्ष अजित कंडरे, द्वितीय उपाध्यक्ष वेलनेस कोच ला. कृत्तांजली सावंत, तृतीय उपाध्यक्ष उद्योगपती ना. तानाजी सालविठ्ठल यांची निवड झाली. यानंतर २०२६-२७ या वर्षाच्या पदाधिकारी व नूतन कार्यकारिणीचा शपथविधी व पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रणव परिचारक होते. शपथविधी व पदप्रदान अधिकारी प्रांताचे द्वितीय उपप्रांतपाल मंगेश दोशी हे लाभले होते. स्वागत डॉ. मंदार सोनवणे यांनी केले. नूतन सदस्य डॉ. कुलदीप कोलपाकवार, पांडुरंग कटकमवार, डॉ. ऋतुजा कोळवले-पाटील, डॉ. शेरॉन भोपटकर, डॉ. मयुरी तंटक, प्रा. पल्लवी भोजने, तेजश्री बंगाळे, आनंद घोडके, उषा खांडेकर या नूतन सदस्यांनी लायनीझमची शपथ घेतली. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान ललिता कोळवले व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन स्वाती जोशी यांनी केले तर डॉ. ऋतुजा कोळवले-पाटील यांनी आभार मानले.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



