जवळ्यात पांढऱ्या दुधावर माजलेल्या बोक्यांचा अखेर पर्दाफाश - अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

तब्बल १५ लाख रुपयांच्या ३७ हजार ५३२ लिटर भेसळयुक्त दुधाची विल्हेवाट

Milk adulterators exposed, Solapur, sangola, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सांगोला प्रतिनिधी 

राज्यातील दबंग प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून संपूर्ण राज्यभर दुधात आणि अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला जात आहे. राज्यभर दुधात होत असणाऱ्या भेसळीचे पेव आता जवळा ता. सांगोला येथे येऊन पोहोचले आहे. जवळा येथील सोनाई उद्योग समूहचा अजिंक्यराणा दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून तब्बल ३७ हजार ५३२ लिटर भेसळयुक्त दूध ताब्यात घेतले आणि त्याची विल्हेवाट लावली. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने ही कारवाई शनिवार दि ११ जुलै रोजी जवळा ता. सांगोला येथील बुरंगेवाडी येथे करण्यात आली. 

दुधात भेसळ करण्याचा हा गोरखधंदा जवळा ता. सांगोला येथील संदीप उर्फ गोट्या समाधान गावडे, श्रीकांत समाधान गावडे, विजय शामराव पाटील व अन्य मंडळीकडून चालवला जात असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी बुरंगेवाडी येथे अजिंक्यराणा दूध संकलन केंद्रामार्फत सोनाई उद्योग समूहाला दूध पुरवठा केला जातो. अल्पावधीतच या दूध संकलन केंद्रावर हजारो लिटर दूध संकलन होऊ लागल्याने या संकलन केंद्रावरून दुधात भेसळ केली जात असल्याची चर्चा जवळा आणि परिसरात रंगू लागली होती. याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाल्याने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शनिवार दि ११ जुलै रोजी दुपारी अचानक बुरंगेवाडी येथील अजिंक्यराणा दूध संकलन केंद्रावर छापा टाकून येथील दुधाचे नमुने ताब्यात घेतले. यावेळी या दुधात भेसळ असल्याचा संशय आल्याने याबाबतची तपासणी केली असता

 या दूध संकलन केंद्रावरून दुधात मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे निदर्शनास आले. त्याचबरोबर या दूध संकलन केंद्रावर संकलन आणि चिलिंग युनिटचा वैध परवाना नसणे जागेवर केलेल्या चाचणीत SNF चे प्रमाण विहित नमुन्यात दिलेल्या प्रमाणापेक्षा कमी असणे, माल पुरवठा आणि खरेदीबाबत कोणतीही पद्धतशीर नोंद नसणे, व अन्न औषध प्रशासनाने घालून दिलेल्या बहुतांशी सर्व नियमांचे उल्लंघन होत असल्याचे धक्कादायक बाब या कारवाईत समोर आली. सदरची कारवाई अन्नसुरक्षा आयुक्त साहेबराव देसाई अन्नसुरक्षा अधिकारी गणेश कदम व अन्नसुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांच्या पथकाने केली. अन्न सुरक्षा विभागाने सांगोला तालुक्यात भेसळखोरांचा भांडाफोड केल्याने तालुक्यातील सामान्य नागरिकांतून या विभागाच्या निर्भीड कामाचे कौतुक होत आहे. 

दुधात भेसळ करणाऱ्या मंडळीवर मकोका लावा

जन्माला आल्यापासून ते शेवटचा श्वास घेईपर्यंत दूध हे मानवी आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. हजारो लोकांच्या जीवनाशी खेळ करून आपले उखळ पांढरे करणाऱ्या दुधात भेसळ करणाऱ्या जवळा ता सांगोला येथील भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे आणि त्यांच्या प्रशासनाने मकोकासारखा कायदा लावून कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता सांगोला तालुक्यातून पुढे येत आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !