श्री संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर, शिवनगर, कन्नड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांच्या पालकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

Ceremony Honoring Meritorious Students, Chhatrapati Sambhaji Nagar, kannad, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (प्रतिनिधी मनोज चव्हाण)  

श्री संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर, शिवनगर, कन्नड येथे इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत पात्रता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांच्या पालकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व श्री शेखर मांडे (मुख्याध्यापक, कै. गुरुदयाल राठोड माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. श्री शेखर मांडे यांची आयआयटी मुंबई येथे “मास्टर ट्रेनर ऑफ मॅथेमॅटिक्स” म्हणून निवड, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत कार्य, बालभारतीच्या पुस्तक व वर्कबुक्सचे परीक्षण, तसेच बालभारती गणित अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून इयत्ता नववी व दहावीच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अभ्यासक्रम निर्मितीत निवड म्हणून संस्थे च्या वतीने ही त्यांच्या कार्याची उल्लेखनीय कार्य म्हणून विशेष सत्कार केला 

या प्रसंगी दहावीच्या बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी कु. तृषा मुकुंद शिंदे, कु. अक्षदा रमेश भाडाईत, कु. तनिषा नारायण पवार, चि. धनंजय विजय नलावडे आणि चि. रोहित बाळू तुपे यांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेच्या पात्रता यादीत स्थान मिळवलेल्या कु. आयुषी गणेश जाधव हिचाही विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागील पालकांच्या योगदानाची दखल घेत त्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रमुख अतिथी श्री शेखर मांडे यांनी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन, गणित व विज्ञान विषयांवरील भीती दूर करून आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन केले. यश हे केवळ गुणांपुरते मर्यादित नसून उत्तम व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त आणि मेहनत यांवरही अवलंबून असते, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये अध्यक्ष श्री साबुसिंग राठोड, उपाध्यक्ष श्री रामदास सुरडकर, सचिव श्री पांडुरंग राठोड, सहसचिव श्री संजय पुरी, कोषाध्यक्ष सौ. सरलाताई सोनवणे, संचालक श्री शिवाजी वाघ आणि संचालक श्री मुकुंद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून भविष्यातही विद्यालयाची यशाची परंपरा अधिक बळकट करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देणारा हा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !