अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक व शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा,असे केले आवाहन
शिवशाही वृत्तसेवा ,कन्नड (प्रतिनिधी मनोज चव्हाण)
कन्नड, दि. १ जुलै : कृषी विभाग व पंचायत समिती, कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने आज कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी श्री. संदीप शिरसाठ उपस्थित होते.
यावेळी सरपंच श्री. सातदिवे, पंचायत समिती सदस्या सौ. मीनाबाई पाडसवान, श्री. करवंदे, तालुक्यातील सर्व मंडळ कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कन्नड येथील अधिकारी-कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बंधू-भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी अधिकारी, पंचायत समिती, कन्नड श्री. विकास चोंधे यांनी केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात तालुका कृषी अधिकारी श्री. संदीप शिरसाठ यांनी हरितक्रांतीचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या कृषी क्षेत्रातील अमूल्य योगदानाची माहिती दिली.
तसेच सध्याच्या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कमीत कमी खर्चात अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक व शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन केले. शासनाच्या कापूस क्रांती अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची, सुधारित तंत्रज्ञानाची, पीक व्यवस्थापनाची तसेच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमास उपस्थित शेतकऱ्यांनी कृषी विषयक विविध प्रश्न उपस्थित करून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमास शेतकरी, महिला शेतकरी तसेच कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



