पंढरपूरचे प्रा.शिवाजीराव वाघमारे यांच्या जडणघडण या पुस्तकाला परिमल सांस्कृतिक व्यासपीठाचा साहित्य परिमल राज्यस्तरीय पुरस्कार

दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण

Shivajirao Waghmare, Parimal Sanskrutik vyaspith, sahitya puraskar, pandharpur, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (प्रतिनिधी राज सारवडे)

परिमल सांस्कृतिक व्यासपीठ, रोपळे बुद्रुक (ता. पंढरपूर) यांच्या वतीने दरवर्षी साहित्य विश्वातील विविध श्रेणीत राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देण्यात येतात. पंढरपूरचे प्रा.शिवाजीराव वाघमारे यांच्या जडणघडण या पुस्तकाला साहित्य परिमल राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी राज्यभरातील विविध श्रेणींतील ३१ साहित्यिकांचा देखील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 

मंचावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव प्रा. डॉ. शिवाजी शिंदे, मराठी साहित्य परिषदेचे पंढरपूर शाखा अध्यक्ष सिद्धार्थ ढवळे, युवा नेते प्रणव परिचारक, आदर्श माता पुष्पलता निकम आणि परिमल सांस्कृतिक व्यासपीठाचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

सुरुवातीला परिमलचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून संस्थेचा आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचा हेतू विषय केला. मंचावरील सर्व मान्यवरांनी परिमल सांस्कृतिक व्यासपीठच्या कामाचे कौतुक करत आज साहित्यासाठी सचिन कुलकर्णी आणि परिमल सांस्कृतिक व्यासपीठ तळमळीने काम करत आहेत हे कौतुकास्पद आहे असे सांगितले

ॲड. उमाकांत आदमाने यांनी सुत्रसंचलन केले तर विश्वविक्रमवीर कवी रवी वसंत सोनार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्याला महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले साहित्यिक आणि साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !