मामाच्या गावाला निघालेल्या दोन बहिणींवर काळाचा घाला

भीषण अपघातात सख्ख्या बहिणींचा मृत्यू, लहान भाऊ  मृत्यूशी झुंजतोय 

road accident, Baramati, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,  (प्रतिनिधी शुभम कोदे)

मामाच्या गावी जाण्यासाठी आनंदाने घराबाहेर पडलेल्या दोन सख्ख्या बहिणींवर काळाने घाला घातला आहे. नीरा-मोरगाव राज्य मार्गावर चौधरवाडी फाटा येथे शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सेजल ज्ञानेश्वर बोडरे (१७) आणि अक्षरा ज्ञानेश्वर बोडरे (१५) या दोन बहिणींचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा लहान भाऊ पवन ज्ञानेश्वर बोडरे (१२) हा गंभीर जखमी झाला आहे. या दुर्देवी घटनेमुळे फलटण तालुक्यातील मुरूम गावसह संपूर्ण पंचक्रोशीत मोठी शोककळा पसरली आहे.

काय घडली घटना?

मुरूम येथील रहिवासी असलेले सेजल, अक्षरा आणि पवन हे तिघेही स्कुटीवरून बारामती तालुक्यातील मुर्टी या आपल्या मामाच्या गावाला निघाले होते. दरम्यान, नीरा-मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाट्याजवळ त्यांच्या स्कुटीची एका टेम्पोसोबत (क्र. एमएच १२ जी ९३४३) समोरासमोर जोरदार धडक झाली.

ही धडक इतकी भीषण होती की स्कुटीचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातानंतर टेम्पो चालकाने स्कुटीला काही अंतर फरफटत नेल्याने या अपघाताची तीव्रता अधिकच वाढली आणि दोन बहिणींचा जागीच मृत्यू झाला.

​लहान भावाची मृत्यूशी झुंज

अपघातात गंभीर जखमी झालेल्या पवनला स्थानिक नागरिकांनी तातडीने बारामती येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पोलिस कारवाई

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतकार्यासाठी धाव घेतली, ज्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर वडगाव निंबाळकर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित टेम्पो चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एकाच घरातील दोन तरुण लेकींचा अपघाती मृत्यू झाल्याने बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !