सोलापूर विधान परिषद निवडणूक

६१५ मतदारांचे भाग्य उद्या मतपेटीत बंद; प्रशासनाची पूर्ण तयारी

Solapur Legislative Council Election, Solapur, malshiras, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,माळशिरस (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद  द्विवार्षिक निवडणुकीसाठी उद्या, १८ जून रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील सहा मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत लोकशाहीचा हा उत्सव पार पडणार असून, प्रशासन यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ६१६ मतदार होते, मात्र एका नगरसेवकाचे दुर्दैवी निधन झाल्याने ६१५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.महत्त्वाची माहिती:

मतदान पद्धत: मतदारांना मतपत्रिकेवर पसंती क्रमांक नोंदवून मतदान करावे लागणार आहे. मतपत्रिकेवर उमेदवारांची नावे (मराठी व इंग्रजी) असतील, परंतु पक्षचिन्ह छापलेले नसेल. तसेच, या निवडणुकीत नोटा (NOTA) हा पर्याय उपलब्ध नाही.

विशेष नोंद: आरटीओ (RTO) कर्मचाऱ्यांच्या संपामुळे इतर कामे ठप्प असली, तरी निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि नियोजित वेळेतच पार पडणार आहे.

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सर्व मतदारांना वेळेत मतदान केंद्रावर उपस्थित राहून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.मतदान केंद्रनिहाय मतदार संख्या: कुर्डुवाडी उपविभागीय कार्यालय. करमाळा, माढा व कुर्डुवाडीचे मतदान. एकूण ८० मतदार. उत्तर तहसील, सोलापूर ,बार्शी, वैराग व सोलापूर महापालिका सदस्य. एकूण १८७ मतदार. दक्षिण सोलापूर तहसील. अक्कलकोट, मंगळवेढा, दक्षिण तालुका. एकूण ८९ मतदार. पंढरपूर तहसील कार्यालय: पंढरपूर व मोहोळ तालुका. एकूण १० मतदार. मंगळवेढा तहसील, मंगळवेढा व सांगोला तालुका. एकूण ९२ मतदार. उपविभागीय कार्यालय, माळशिरस. माळशिरस तालुक्यातील ९७ मतदार. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. 

मतमोजणी: मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणी २२ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून जिल्हा नियोजन भवन येथे होईल.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !