मारकडवाडीच्या लेकीचा झेंडा रोवला- स्नेहल वाघमोडे यांची कृषी अधिकारी पदी निवड

आ. रामभाऊ सातपुते यांच्या हस्ते सत्कार

Selection for the post of Agricultural Officer,Ms. Snehal Shobha Balaso Waghmode, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, माळशिरस (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)  

ग्रामीण भागातील जिद्द आणि कष्टाला जर योग्य दिशेची जोड मिळाली, तर यशाची शिखरे कशी गाठता येतात, याचे उत्तम उदाहरण मारकडवाडी (ता. माळशिरस) येथील कु. स्नेहल शोभा बाळासो वाघमोडे हिने सिद्ध केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या राज्य कृषी सेवा परीक्षेत घवघवित यश संपादन करत, तिची कृषी अधिकारी (वर्ग-२, राजपत्रित) या पदावर निवड झाली आहे.

या उत्तुंग यशाबद्दल माळशिरसचे लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते यांच्या हस्ते स्नेहल वाघमोडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आ. सातपुते म्हणाले की, "स्नेहलने मिळवलेले हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण माळशिरस तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे. तिच्या या यशामागील कठोर परिश्रम, चिकाटी आणि समर्पण ग्रामीण भागातील नवीन पिढीसाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल."

यावेळी आ. सातपुते यांनी स्नेहल वाघमोडे यांच्या उज्ज्वल शासकीय कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, "स्नेहलच्या कार्याचा उपयोग भविष्यात शेतकरी बांधवांच्या हितासाठी आणि कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी होईल, अशी मला खात्री आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या सन्मान सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, वाघमोडे कुटुंबातील सदस्य आणि मारकडवाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहल वाघमोडे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !