आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते एखतपूर केंद्र शाळेत प्रवेशोत्सव व वृक्षारोपण उत्साहात

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून घेतल्यास मुलांचा सर्वांगीण विकास : आ. डॉ. बाबासाहेब देशमुख

School Admission Festival and Tree Plantation Celebrated, Solapur,sangol, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सांगोला (प्रतिनिधी) 

नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, एखतपूर येथे 'प्रवेशोत्सव' आणि 'वृक्षारोपण' कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि आनंदमयी वातावरणात संपन्न झाला. सांगोल्याचे लोकप्रिय आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.

विद्यार्थ्यांची सवाद्य मिरवणूक अन् महापुरुषांना अभिवादन

कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता पहिलीमध्ये नवीन प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सवाद्य मिरवणुकीने झाली. या मिरवणुकीदरम्यान गावातील मुख्य चौकात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मुख्य शालेय कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, जिल्हा परिषद सदस्या सिंधुताई मोहन आलदर, गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, सरपंच वर्षाताई जाधव तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रतिक्षा नीलकंठ यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांचे स्वागत आणि मोफत साहित्याचे वाटप

एखतपूर केंद्र शाळा, लिंगेवस्ती, जगतापवस्ती आणि रामरहीमनगर येथील शाळांमधील इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेशित सर्व मुलांचे गुलाबपुष्प देऊन वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना शासनातर्फे मिळणारे मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे, यंदा खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून नाव कमी करून या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या २० विद्यार्थ्यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला, ज्याने जिल्हा परिषद शाळांवरील पालकांचा वाढता विश्वास अधोरेखित केला.

"माझे स्वतःचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेतच मराठी माध्यमातून झाले आहे. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून घेतल्यास मुलांचा सर्वांगीण आणि वैचारिक विकास अधिक चांगला होतो. एखतपूर शाळेच्या भौतिक सुविधांच्या सर्व मागण्या मी आमदार निधीतून पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे."

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख ,प्रमुख मान्यवरांची उपस्थिती मुख्याध्यापक हणमंत जाधव यांनी प्रास्ताविकात शाळेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची, आजवर मिळालेल्या यशाची आणि शाळेला आवश्यक असलेल्या भौतिक सुविधांच्या मागण्यांची माहिती आमदार महोदयांसमोर मांडली.

या सोहळ्यास केंद्रप्रमुख सुखदेव लवटे, ग्रामविकास अधिकारी शंकर मेटकरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य हरिबा इंगोले (नाना), ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षकांचे परिश्रम व सांगता

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक दिलीप नवले, भारत मेटकरी, नीलकंठ मॅडम, ज्ञानेश्वर इंगोले, निसार इनामदार, काळेबाग गुरुजी, संजय बुरांडे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर इंगोले यांनी केले, तर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !