लोणंदमध्ये रंगणार आषाढी वारीनिमित्त भव्य सोहळा - पाऊले चालती पंढरीची वाट कार्यक्रमाचे आयोजन

ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन आणि भव्य भजन स्पर्धांचे आकर्षण

Ashadhi Wari Kirtan, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

सन २०२६ च्या आषाढी वारीचे औचित्य साधून बळीराजा फाउंडेशन (बाळूपाचलाचीवाडी) व समस्त खंडाळा तालुका वारकरी सांप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने लोणंद येथे "पाऊले चालती पंढरीची वाट" या विशेष सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी श्री ज्ञानेश्वर माऊली पालखीतळ (बाजारतळ), लोणंद (जि. सातारा) येथे हा सोहळा पार पडणार आहे.

     या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे शनिवार दि. २७ जून (सकाळी १० ते सायं. ७) आणि रविवार दि. २८ जून (सकाळी १० ते दुपारी ५) या काळात 'भव्य भजन स्पर्धा' रंगणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल असून उत्कृष्ट तबला व पखवाज वादकांनाही विशेष उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार आहेत.

     रविवार दि. २८ जून रोजी सायं. ५ ते ७ या वेळेत समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे जाहीर कीर्तन होणार आहे. त्यानंतर सायं. ७ ते ८.३० या वेळेत भव्य बक्षिस वितरण, साहित्य वाटप व सत्कार सोहळा संपन्न होईल.

     या सोहळ्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आणि माढा लोकसभेचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते विविध कार्यक्रमांचे उद्घाटन होईल.

     तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आ. डॉ. अतुल भोसले, माजी आ. मदनदादा भोसले, आ. धैर्यशील कदम, आ. मनोज घोरपडे, आ. सचिन पाटील, अभिनेता व भाजपा प्रदेश कार्यालय प्रमुख रवीजी अनासपुरे, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रियाताई शिंदे, आणि पश्चिम महाराष्ट्र समन्वयक विक्रम पावसकर यांच्यासह खंडाळा तालुक्यातील अनेक मान्यवर व वारकरी संप्रदायातील ह.भ.प. व्यक्तिमत्त्वे मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

     या भक्तीमय सोहळ्याचा व कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील सर्व भाविक व वारकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक उत्तमराव सावंत (अध्यक्ष, बळीराजा फाउंडेशन), डॉ. नितीन सावंत (अध्यक्ष, सुवर्णगाथा प्रतिष्ठान) आणि समस्त खंडाळा तालुका वारकरी सांप्रदायाच्या वतीने करण्यात आले आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !