जुनीपेठ पोलीस चौकी परिसरात घराला आग मात्र मोठी दुर्घटना टळली

माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांच्या कार्यतत्परतेमुळे आग आटोक्यात

Terrific fire in junipet, pandharpur, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)

शहरातील गजबजलेल्या जुनी पेठ पोलीस चौकी समोरील घराला अचानक आग लागली. या आगीत घर मालक बाबर यांच्या घरातील किरकोळ साहित्य जळून खाक झाले आहे. आग भडकल्याचे लक्षात येताच माजी नगरसेवक व भाजप माजी शहरामध्यक्ष विक्रम शिरसट यांनी तात्का ळ घटनास्थळी भेट देत नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाच्या मदतीने आग विझवली व मोठी घटना टाळली आहे.

जुनी पेठमधील बाबर यांच्या पडक्या घराला मंगळवारी अचानक आग लागली. या आगीमुळे घरात पडलेल्या कचऱ्याने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्र रुप धारण केले. शेजारील घराना आगीचा फटका बसतो की काय, अशी भिती निर्माण झाली होती. मात्र, माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवित हानी टळली आहे. यावेळी येथील नागरिकांनी अज्ञाताने कचरा पेटवल्याचा आरोप केला आहे. या घराच्या वरुन विद्युत वाहिनीच्या केबळ, डिश टिव्हीच्या केबल गेल्या आहेत. यास आग लागली असती तर परिस्थीती अधिकच बिकट झाली असती. मात्र, नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाच्या मदतीने वेळीच आग विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !