नागरीकांचे गहाळ झालेले ९,३५,००० रुपये किमतीचे एकुण ४३ मोबाईल भुईज पोलिसानी केले हस्तगत

भुईज पोलीसाची दमदार कामगिरीStrong performance of Bhuij Police, Satara, Wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

भुईज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नागरिकांचे गहाळ झालेले नऊ लाख 35 हजार रुपये किमतीचे 43 मोबाईल हस्तगत करण्यात भुईज पोलिसांना यश आले आहे. 

भुईंज पोलीस ठाणे हद्दीमध्ये पाचवड, भुईज अशी मुख्य बाजारपेठ असुन आजुबाजुच्या गावातुन हजारोंच्या संख्येने नागरीक बाजारपेठेत खरेदी विक्री साठी ये - जा करत असल्यामुळे प्रवासा दरम्याण तसेच बाजारपेठेत त्यांचे मोबाईल फोन गहाळ होण्याचे प्रमाण अधिक वाढले होते.

पोलीस अधीक्षक निखिल पिगळे  यांनी गहाळ मोबाईल बाबत पोलीस ठाणे स्तरावर एक विशेष मोहिम राबवण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने  अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर,  उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे वाई विभाग वाई यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी   सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले मोबाईलचा शोध घेणे करीता पोलीस ठाणे स्थरावर एक विशेष पोलीस पथक तयार केले होते. 

त्याअनुषंगाने पथकातील पो कॉ. कुंभार यांनी सी ई आय.आर. पोर्टल व इतर तांत्रिक बाबीच्या आधारे महाराष्ट्रासह इतर राज्यातून हस्ते परहस्ते गहाळ झालेले मोबाईल वापर असलेल्या मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क करुन चिकाटीने सदरची मोहिम राबवून भुईंज पोलीस ठाणे हद्दीतून गहाळ झालेले ९.३५,०००/- (नऊ लाख पत्तीस हजार रुपये) किमतीचे एकुण ४३ स्मार्ट फोन हस्तगत करण्यात यश आले आहे. 

हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल फोन मध्ये एक आयफोन-१६ प्रो मॅक्स हा महागडा मोबाईल देखील हस्तगत करण्यात आला आहे. यापुर्वी देखील भुईंज पोलीसांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये नागरीकांना ६,७०,०००/- रुपये किमतीचे एकुण ३० मोबाईल परत केले आहेत. यापुढे देखील अशाच प्रकारची गहाळ मोबाईल फोन शोधण्याची मोहिम सातत्याने रबविण्यात येणार असल्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक  पृथ्वीराज ताटे, भुईंज पोलीस ठाणे यांनी सांगितले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे वाई विभाग वाई यांच्या मार्गदर्शनाखाली  पृथ्वीराज ताटे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे , भुईंज पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील,  सुरज शिंदे, सपोफौ वैभव टकले, पो.हवा. नितीन जाधव, पो. हवा. अप्पा कोलवडकर, पो.ना सुशांत धुमाळ, पो. कॉ कुंभार, पो.कॉ.सोमनाथ बल्लाळ, पो.कॉ. सागर मोहिते, पो. कॉ. किरण निबाळकर यांनी पुर्ण केली आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !