विज वितरणच्या गलथान कारभारामुळे कुसगाव येथे भरवस्तीत असणाऱ्या डिपीला भिषण आग

मोठी दुर्घटना टळली, मात्र ग्रामस्थांन मध्ये संतापाची लाट

Power supply DP catch fire, public panic, Wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई तालुक्याच्या पश्चिम भागात डोंगर दर्यात वसलेले अंदाजे दिड हजार लोकवस्तीचे कुसगाव हे गाव आहे या गावाच्या भरवस्तीत मध्यभागी गावाला विज पुरवठा करण्यासाठी विज वितरण कंपनीने गेल्या कित्येक वर्षां पुर्वी  डिपी

बसवलेली आहे याला आधार म्हणुन बसवलेले लोखंडी खांब हे सडलेले आहेत या गावात मोठे वारा वादळ आल्यास हे कुचकामी ठरलेले लोखंडी खांब डिपीसह कुठल्याही क्षणी जमीन दोस्त होवुन कधीच न भरुन येणारी मोठी दुर्घटना होऊ शकते . त्यासाठी गावात भिषण दुर्घटना होवुन माणसांचे मुडदे पडु नयेत म्हणुन ग्रामस्थांनी एकत्रीत येवुन शेकडो समस्यांच्या  सह्यांचे निवेदन तयार करून अनेकदा देवुन देखील विज वितरण कंपनीच्या कुठल्याही अधिकार्यांनी कधीच लक्ष घालून गावच्या सुरक्षेसाठी कधीच प्रयत्न न केल्याने येथील रहिवाशांन मध्ये संतापाची लाट उसळली आहे .

येथील डिपी मध्ये  आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक शॉकसर्कीट होवुन डिपीतुन धुराचे मोठे मोठाले धुराचे लोट बाहेर येत असताना काही तरुणांनी पाहीले आणी क्षणार्धात डिपीने पेट घेतला व त्याच्यातुन आगीचे लोट बाहेर येवु लागले हे पाहताच तरुणांनसह ग्रामस्थांनी पाण्याचा मारा करुन आग विझवली पण आगीने रौद्ररूप धारण केल्याने डिपी जळुन खाक झाली . निव्वळ गलथान कारभार मुळे  विज वितरण कंपनीचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

इकडे सुर्य आग ओकत असल्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत असतानाच घराघरातील विध्दुत पुरवठा रामभरोसे कालावधी साठी खंडीत झाल्याने ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांचे मोठे हाल होताना दिसत आहेत.या निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नाकडे वाईच्या कार्यकारी अभियंता कार्यालयातील. वरिष्ठ अधिकारी लक्ष घालुन विद्युत पुरवठा सुरळीत चालू करतील का ?असा सवाल कुसगाव ग्रामस्थांनी विचारला. आहे . नवीन डिपी बसवताना भरवस्तीत बसवु नये अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे .

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !