पश्चिम भागात केबल चोरांचा धुमाकूळ - पाणीपुरवठा योजना धोक्यात

पोलिसांनी तातडीने कडक कारवाई करावी अन्यथा आंदोलन करू - संतप्त ग्रामस्थांचा इशारा

Cable Thieves Run Amok, Water Supply Scheme at Risk, Wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई तालुका मधील पश्चिम भागातील वेलंगसह धरणालगतच्या अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनांच्या मोटारी व केबल चोरीच्या घटनांनी नागरिक हैराण झाले आहेत. वारंवार होणाऱ्या या चोऱ्यांमुळे गावांवर गंभीर पाणीटंचाईचे संकट ओढावले असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ऐन उन्हाळ्यात मुंबई-पुण्यासारख्या शहरांतून गावाकडे आलेल्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणीपुरवठा योजनेच्या केबल व मोटारी चोरट्यांकडून वारंवार लंपास केल्या जात असल्याने ग्रामस्थांचे हाल होत असून प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी झालेल्या चोरीप्रकरणात पोलिसांना चोरांचा माग काढता आला नव्हता. अखेर गावकऱ्यांनीच चोर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला होता. मात्र संबंधित आरोपी काही दिवसांतच जामिनावर सुटल्याने चोरट्यांचे मनोबल वाढल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. “चोर पकडायचा आणि पुन्हा सोडून द्यायचा” हा प्रकार थांबला नाही तर भविष्यात नागरिकांना घरात राहणेही कठीण होईल, अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

या भुरट्या चोऱ्यांमुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. आधीच कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या शेतकऱ्यांच्या उरावर आता केबल चोरीचे संकट बसले आहे. लाखो रुपयांच्या केबल आणि मोटारी आतापर्यंत चोरीला गेल्या असून प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

पश्चिम भागात सुरू असलेला हा “चोर-पोलिस” खेळ थांबवण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. धरण परिसरातील गावांमध्ये रात्री गस्त वाढवणे, संशयित टोळ्यांवर नजर ठेवणे आणि पकडलेल्या आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

उन्हाळ्यात पाण्यासाठी लोकांचे प्रचंड हाल होत असताना मोटार व केबल चोरी करणाऱ्या चोरट्यांवर तातडीने लगाम घालावा, अन्यथा नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पश्चिम भागातील ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाला आता थेट इशारा देत “कडक कारवाई करा, अन्यथा जनआंदोलन उभारू,” असा इशारा दिला आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !