पसरणी घाटात कंटेनरचा थरार

कारला धडक देऊन कंटेनर कठड्यावर उलटला

Container thrill at Pasarani Ghat, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई-पाचगणी मार्गावरील पसरणी घाटात बुवासाहेब मंदिराजवळ एका भरधाव कंटेनरने कारला धडक देऊन संरक्षक कठड्यावर उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

     बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तक्रारदार संपत दगडू आंब्राळे (वय ५५, रा. आंब्रळ, ता. महाबळेश्वर) हे आपल्या कारने वाईकडून पाचगणीच्या दिशेने जात होते.

त्याच वेळी समोरून कंटेनर घेऊन येणारा चालक मकसुदन श्रीरमाकांत उपाध्याय (रा. दहिसर, मुंबई) हा वाईच्या दिशेने येत होता. चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने त्याने भरधाव वेगातील कंटेनर आधी घाटाच्या संरक्षक कठड्याला धडकवला आणि त्यानंतर तो आंब्राळे यांच्या कारवर आदळून उलटला.

     या अपघाताची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. या अपघात प्रकरणी संपत आंब्राळे यांनी वाई पोलिसात तक्रार दिली असून मकसुदन उपाध्याय याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पोलीस हवादार भोईर हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पसरणी घाटात सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, वाहनचालकांनी घाटात सावधगिरीने वाहने चालवावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !