गरवारे फायबर्स च्या ११०० रणरागिणींचा गौरव

वाईत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा 

Celebrating Women's Day, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

"स्त्री आज केवळ कुटुंबाचा आधार नसून राष्ट्रनिर्मितीची मुख्य शक्ती आहे. गरवारे टेक्निकल फायबर्समध्ये कार्यरत असलेल्या ११०० हून अधिक महिलांनी आपल्या परिश्रमाने कंपनीचे उत्पादन जागतिक बाजारपेठेत पोहोचवले आहे," असे गौरवद्गार रमेश गरवारे इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका अपूर्वा कुलकर्णी यांनी काढले.

वाई येथील औद्योगिक वसाहतीतील गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त वाई-पाचवड रस्त्यावरील सुशिला मंगल कार्यालय येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात कंपनीतील ११०० पेक्षा जास्त महिला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला.

कर्तृत्ववान महिलांचा सन्मान 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंपनीचे प्रेसिडेंट विवेक कुलकर्णी होते. दीपप्रज्वलन आणि गणेशपूजनाने या सोहळ्याची दिमाखदार सुरुवात झाली. व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून अपूर्वा कुलकर्णी, व्हाईस प्रेसिडेंट अरविंद कुलकर्णी, जनरल मॅनेजर युवराज थोरात, सचिन कुलकर्णी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात विवेक कुलकर्णी म्हणाले की, "शिक्षण, विज्ञान, राजकारण आणि उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रात महिला आज यशाची पताका फडकवत आहेत. महिलांना समान संधी आणि सन्मान देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. गरवारे कंपनी केवळ व्यवसाय न करता सामाजिक बांधिलकीतून महिलांचे आरोग्य, शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध आहे."

सांस्कृतिक कार्यक्रम अन् लकी ड्रॉची रंगत

या सोहळ्यात महिलांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आणि 'हळदी-कुंकू' समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या 'लकी ड्रॉ'मध्ये तीन भाग्यवान महिलांना विशेष भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच, वर्षभरात सर्वाधिक कामाचे दिवस (Attendance) पूर्ण करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. उपस्थित प्रत्येक महिला कर्मचाऱ्याला कंपनीच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनरल मॅनेजर युवराज थोरात यांनी केले. त्यांनी कंपनीतर्फे वर्षभर राबवल्या जाणाऱ्या महिला कल्याणकारी योजनांची माहिती दिली. या प्रसंगी बलजीतसिंग सैनी, चंद्रशेखर बदाने, प्रशांत कुलकर्णी, कामगार संघटनेचे सेक्रेटरी अर्जुन सावंत यांच्यासह अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन कल्याणी दुधाने व धनश्री ढगे यांनी केले, तर जनरल मॅनेजर सचिन कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

      -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !