कुंटूर जि.प.शाळेला अवैध दारू दुकानाचा विळखा

दारू विक्रेत्यावर कारवाईसाठी शिवसेनेचे निवेद

Action against liquor seller, Naigaon, Nanded, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,नांदेड (प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)

  नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर येथील जिल्हा परिषद शाळे जवळील अनेक दारू विक्रेत्यांनी आपली देशी विदेशी दारूचे अवैधरित्या दुकाने थाटली आहेत,पोलीस ठाणे गावातच असून हे अवैधरित्या दारूचे दुकाने कशी काय हा प्रश्न आहे ? जिथे ज्ञान संस्कार मिळणारी जिल्हा परिषद शाळेजवळील सर्व देशी दारू दुकाने तात्काळ बंद करून दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यात यावी शिवसेना उबाठा गटाचे युवा सेना तालुकाप्रमुख शिवाजी यादव ईबीतदार यांनी निवेदनाद्वारे तक्रार वरिष्ठाकडे केली आहे. 

कुंटूर हे गाव तालुक्यात सर्वाधिक मोठे गाव आहे,माजी मंत्राचे देखील गाव असून  या गावात जिल्हा परिषद शाळा देखील मोठी आहे शाळेच्या सभोवतालील कंपाऊंड असलेल्या बाजूस काही दारू विक्रेत्यांनी आपली देशी विदेशी दारूचे अवैधरित्या दुकाने थाटली आहे विशेष म्हणजे गावात पोलीस ठाणे असून देखील हे अवैधरित्या देशी दारू दुकाने कशी काय ? याबाबत अधिक काही सांगणे नको परंतु शालेय विद्यार्थ्यांना ज्ञान संस्काराचे धडे मिळणारी शाळेच्या अगदी जवळ देशी दारूचे दुकाने कशी काय असावी शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य माणसांना देखील याचा नाहक त्रास होत असल्याने देशी दारूचे अवैधरित्या चालणारे दुकाने बंद करावी अवैधरित्या दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उबाठा गटाचे नायगाव युवा तालुकाप्रमुख शिवाजी यादवराव ईबितदार यांनी अधीक्षक राज्य उत्पादक शुल्क नांदेड यांच्याकडे तक्रारी निवेदनाद्वारे केली आहे.

 कुंटूर येथील अवैध देशी दारू विक्री विषयी अनेकांचे निवेदने दिली व विविध वृत्तपत्रात बातम्या देखील छापली गेली याबाबत आजवर कुठलीच कारवाई नाही, आजही दुकाने मात्र जोमात चालू आहेत.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !