वाईत १५० व्या जयंतीनिमित्त नगराध्यक्ष अनिल सावंत यांचे प्रतिपादन - समाजमंदिराच्या नूतनीकरणाचे दिले आश्वासन

संत गाडगेबाबांचे विचार आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली

Sant Gadge Baba's birth anniversary, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )

“संत गाडगेबाबा महाराजांनी स्वच्छता, सेवा आणि समाजजागृतीचा जो महान संदेश दिला, तो केवळ भाषणापुरता मर्यादित न ठेवता प्रत्येक नागरिकाच्या आचरणात उतरला पाहिजे. संतांच्या विचारांवर चालणारे शहरच खऱ्या अर्थाने प्रगत होते,” असे प्रतिपादन वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी केले.

 संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वाई शहरातील परिट समाजाच्या वतीने संत गाडगेबाबा महाराज न.पा. शाळा क्र. ६ येथील समाज मंदिरात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

 नगराध्यक्ष सावंत पुढे म्हणाले की, “गाडगेबाबांनी स्वतः हातात झाडू घेऊन समाजाला स्वच्छतेचा आदर्श घालून दिला. आज आपल्या शहरात स्वच्छता, शिक्षण आणि सामाजिक एकोपा जपण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. कृष्णाकाठावरील या समाजमंदिराची अवस्था सध्या काहीशी खराब असली, तरी येत्या काळात त्याची योग्य पद्धतीने डागडुजी करून एक सुंदर वास्तू तयार करण्यात येईल,” असे आश्वासनही त्यांनी यावेळी समाजबांधवांना दिले.

    यावेळी उपनगराध्यक्ष घनशाम चक्के, नगरसेवक भारत खामकर, प्रसाद बनकर, नगरसेविका सौ. अपर्णा जमदाडे, सौ. पदमा पाडळे-जाधव, माजी नगरसेविका सौ. स्मिता हगीर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक भारत खामकर व प्रसाद बनकर यांनीही आपले विचार व्यक्त करताना, गाडगेबाबांच्या विचारातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

   सकाळी समाजबांधवांच्या वतीने शाळा क्र. ६ येथील बाबांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी समाजाला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. लाखानगर भजनी मंडळाने सादर केलेल्या भजन सेवेबद्दल सर्व कलावंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

  या सोहळ्याचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमार पवार यांनी केले. कार्यक्रमासाठी अशोक दळवी, ज्ञानेश्वर वाघ, बंडू दळवी, प्रदीप दळवी, उमेश माने यांच्यासह परिट समाजातील महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !