शिवाजी महाविद्यालय कन्नड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष शिबिराचे आयोजन

व्यक्तीमत्व विकासासाठी चांगला श्रोता होणे गरजेचे आहे-डॉ अतिष मेहेत्रे

NSS camp, Chhatrapati Sambhaji Nagar, kannad , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,कन्नड ( प्रतिनिधी मनोज चव्हाण )

कन्नड : शिवाजी महाविद्यालय कन्नड आयोजित मौजे दाभाडी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष शिबिरांतर्गत सहाव्या दिवशी दुपारच्या सत्रात राष्ट्रीय सेवा योजना व व्यक्तिमत्व विकास"  यावर मार्गदर्शन करत असतान त्यांनी सांगितले की, 

व्यक्तिमत्व विकास ही काळाची गरज आहे,व्यक्तिमत्व विकासामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो ,आयुष्यात येणाऱ्या विविध अडचणीवर तो मात करू शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन विविध शिबिरामध्ये आवर्जून भाग घ्यावा व स्वतः चा व्यक्तिमत्व विकास कसा वाढेल यावर लक्ष द्या. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात मौजे दाभाडी  गावात

स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छतेची शपथ घेण्यात आली या शपथेसाठी गावातील  नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य मुक्तारभाई शहा व ग्रामस्थ हजर होते, त्यानंतर एड्स जनजागृती रॅलीचं आयोजन  मौजे दाभाडी या गावांमध्ये आयोजन करण्यात आलं त्यासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयाचे श्री संजय सोनवणे, रेड रिबीन क्लब चे संचालक डॉ संघई सर उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना एड्स या रोगाबद्दल माहिती दिली व मार्गदर्शन केले, आपल्या अध्यक्षीय समारोपात ग्रंथपाल डॉ.संतोष देशमुख यांनी सांगितले  की, व्यक्तिमत्व विकासामध्ये चांगला श्रोता होणे हा एक घटक महत्त्वाचा आहे ज्याला चांगला श्रोता होता येते तो चांगला वक्त होतो असे मत त्यांनी मांडले

याप्रसंगी  एनएसएस विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ प्रकाश महाजन, डॉ. राकेश अहिरराव डॉ. सीमा काशीद संयोजन समितीचे सदस्य प्रा.प्रगती चव्हाण, उपस्थित होते, कार्यक्रमाचे सुत्र संचलन आणि पाहुण्यांचा परिचय यश पाटील याने   केले कार्यक्रमाचे प्रास्तविक रेवती खरे  आभार प्रदर्शन सोयम कायस्थ याने केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनएसएस विभागाने विशेष प्रयत्न केले.

      -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !