क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
शिवशाही वृत्तसेवा ,शिरूर ( प्रतिनिधी फैजल पठाण )
जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (ज्ञानाई )यांची जयंती शिरूर येथील हुतात्मा स्मारक या ठिकाणी साजरी करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका तसेच नगरसेवक व शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते प्रतिमेला अभिवादन करून करून पुष्पहार अर्पण करण्यात आला .
यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचरने यांच्ये पती माजी नगरसेवक अभिजीत पाचरणे तसेच नवनिर्वाचित नगरसेवक रवींद्र ढोबळे, सागर नरवडे, निलेश गाडेकर डॉ. सुनिता पोटे, स्वप्नाली जामदार, सुनीता भुजबळ, स्वीटी शिंदे ,पूजा पोटावळे, पोलीस उपनिरीक्षक झेंडगे मॅडम तसेच सचिन राजापुरे, डॉ.संतोष पोटे, एडवोकेट सुप्रिया साकोरे, डॉ.वैशाली साखरे, सामाजिक कार्यकर्त्यां राणीताई कर्डिले, सविता बोरुडे, प्रीती सोनवणे, उपस्थित होते.
तसेच या जयंती उत्सव समितीचे संस्थापक रवींद्र बापू सानप व समितीचे प्रमुख राजुशेठ खेतमाळीस तसेच गोपीनाथ पठारे मनसेचे उपजिल्हाप्रमुख महेबूब सय्यद, रामेश्वर यादव ,अनिल बांडे, रवी लेंडे, बाबू पुजारी ,आप्पा पोटघन, सुनील दादा चौधरी, राजू शेख, कैलास घाडगे, सचिन खामकर ,सागर घोलप, किरण बनकर तसेच पत्रकार धुमाळसर, अभिजीत आंबेकर ,मुकुंद ढोबळे, फिरोज शिकलकर, फैजल पठाण इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केला.
----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



