सलग तिसऱ्या वर्षी मोठे यश मिळवत केली विजयाची हॅट्रिक
शिवशाही वृत्तसेवा, तुळजापूर (प्रतिनिधी गणेश पाटील)
25 डिसेंबर 2025 रोजी पुणे येथे झालेल्या स्मार्ट अबॅकस नॅशनल लेवल 2025 च्या ऑफलाईन स्पर्धेत तुळजापूर सेंटरचा कुमार राजवीर विठ्ठल लोड इयत्ता दुसरी याने नऊ मिनिटात 150 पैकी 150 गणिते बरोबर सोडवून देशात प्रथम क्रमांक मिळवत सायकल, ट्रॉफी मेडल,सर्टिफिकेट बक्षीस मिळवली तर कुमार विहान तानाजी बागल यावर्षी देशात चौथा क्रमांक मिळवत सलग तीन वर्ष यशाची हॅट्रिक केली. विहान ने सन 2023-24 च्या स्पर्धेत देशात दुसरा क्रमांक मिळवला तर सन 2024-25 च्या नॅशनल लेव्हल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत लॅपटॉप, सायकल,मेडल, ट्रॉफी आदी बक्षिसे मिळवली. तसेच शुभांगी बागल यांच्या तामलवाडी सेंटर मधून या स्पर्धेत कुमारी सिद्धी शैलेश गुत्ती हिने देशात पाचवा क्रमांक मिळवत तामलवाडी चे नाव देशात झळकवले. शुभांगी मॅडमच्या तुळजापूर व तामलवाडी सेंटर मधून 47 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या सर्व स्पर्धकांना सेंटरच्या संचालिका सौ. शुभांगी तानाजी बागल यांनी दोन महिने अथक प्रयत्न व परिश्रम घेऊन मुलांना यशापर्यंत नेऊन दैदीप्यमान यश मिळवले. सर्व यशस्वीतांचे तुळजापूर व परिसरात कौतुक होत आहे. नवीन वर्षा निमित्त स्मार्टअस अबॅकस क्लास लोहिया विभाग तुळजापूर मध्ये प्रथम प्रवेश घेणाऱ्या 21 विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येईल तरी इच्छुकांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन संचालिका शुभांगी बागल मॅडम यांनी केले आहे संपर्क 98 22 46 69 07 व 98 22 0 76 369
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



