सामाजिक कार्याची दखल
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर ( प्रतिनीधी फैजल पठाण )
तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बि गुजर प्रशालेत सोमवार दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी शिरूर तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट )डॉ सुजित शेलार यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गुणगौरव शिरूर तालुक्याचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्या हस्ते संपन्न झाला.
डॉ सुजित शेलार यांनी आजपर्यंत रक्तदान शिबिर,शुगर तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, डोळ्यांचे शिबिर, चष्मे वाटप वडगाव रासाई या ठिकाणांसह शिरूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये वृक्षारोपण करणे तसेच शाळेतील गोरगरिब दीन दलित विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप करणे, विद्यालयातील विद्यार्थ्यांना अनेक कंपन्यांमधून बेंच मिळवून देण्यासाठी पाठपुरावा असेल,तेसेच आमदार माऊली आबा कटके यांच्या माध्यमातून रुग्णांना दवाखान्याची मदत मिळवून देणे अश्या अनेक सामाजिक जाणीवतेची त्यांनी जपणूक केली आहे त्यामुळे त्यांचा सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात शिरूर चे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडला.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ व विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, रांजणगावचे पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, तालुका विस्तार अधिकारी आर आर राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूर निळकंठ गव्हाणे, उपअधीक्षक भूमी अभिलेख अमोल भोसले, दुय्यम निबंधक शिरूर चे सुरज बाबर, अन्न व पुरवठा अधिकारी सदाशिव व्हनमाने, महावितरणचे उप अभियंता सुमित जाधव ,अशोक भोरडे आणि त्यांचे सहकारी डॉक्टर ओंकार जाधव, ॲड.बाबुराव ढमढेरे, अतुल पाचुंदकर, भगवान थोरात, गोपाळ भुजबळ, गणेश पवार, अक्षय ढमढेरे, प्रमोद चौधरी, दत्तात्रय तरटे, पत्रकार शौकत शेख ,
सचिन पंडित ,प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे ,उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे ,पर्यवेक्षक मोहन ओमासे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे चे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर ,मानद सचिव अरविंद ढमढेरे ,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे ,विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी डॉ सुजित शेलार यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व शुभेच्छा दिल्या व त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा आदर्श आत्ताच्या सर्व तरुणांनी घ्यावा असे उत्तम उदाहरण त्यांनी दाखवून दिले आहे असे उदगार त्यांनी शेवटी काढले.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














