ग्रामस्थांकडून रात्री पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
कुसगाव येथील ब्लॅक जेम्स स्टोन क्रेशर परिसरामध्ये मुकुटराव घाडगे या ग्रामस्थांचा आकस्मित मृत्यू झाला. यानंतर पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाले. सदर मृत्यू हा ब्लास्टिंग मुळे झाल्याचा आरोप संबंधित घाडगे यांच्या कुटुंबीयांनी केला व क्रशर बालक यांच्यावर गुन्हा दाखल करणे संबंधित मागणी करण्यात आली. या मागणीला मान्य न करत आकस्मित मृत्यू झाल्यास तपास झाल्यावरच गुन्हा दाखल करण्यात येतो अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.
मागील दोन वर्षांमध्ये क्रशर प्रकरणांमध्ये ग्रामस्थांवर शेकडो गुन्हे दाखल झाले हे दाखल करत असताना पोलिसांनी कोणत्याही गोष्टीचा तपास न करता थेट ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले व तदनंतर ग्रामस्थांना आपली बाजू कोर्टातच मांडायला लागली. मात्र आता प्रकरण अधिक गंभीर झाले आहे क्रशर मुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे असे असताना सुद्धा या प्रकरणी मात्र तपास झाल्यावरच गुन्हा दाखल करण्यात येईल यावर पोलिसांनी आपली भूमिका ठाम ठेवल्यामुळे अखेर ग्रामस्थांना पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली. त्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळणार यात कोणतीच शंका नाही.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














