प्रमोद शिंदे ; शेतकऱ्यांच्या सहकार्यातून गाळपाचे उद्दीष्ठ साध्य करणार
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व खंडाळा येथील किसन वीर-खंडाळा सहकारी साखर उद्योगाकडे गळित हंगाम सन २०२५-२६ मध्ये गाळपास येणाऱ्या ऊसास प्रति मेट्रिक टन ३हजार ३५० रूपये देण्याचा निर्णय कारखान्याच्या झालेल्या संचालक मडळाच्या सभेमध्ये झाला असल्याची माहिती , कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने अतिशय सुक्ष्म नियोजन केल्यामुळेच किसन वीर कारखाना प्रतिदिन ५२०० व खंडाळा कारखाना ३२०० मेट्रिक टनाने गळित सरू आहे. कारखान्याचे को-जन प्रकल्प, डिस्टीलरी प्रकल्पही सुरू आहे. किसन वीर व खंडाळा कारखान्याचे अचुक काटे हे शेतकऱ्यांच्यामध्ये विश्वास वाढविण्याचे काम करीत आहे. मागील तीन हंगामामध्ये शेतकरी वर्ग, सप्लायर, तोडणी वाहतूकदारांची सर्व देय्यके दिल्यामुळे सर्वामध्ये कारखान्याप्रती विश्वास निर्माण झालेला आहे.
याचाच परिपाक या गळित हंगामात दिसून येत आहे. तो म्हणजे दोन्ही कारखाने सुरूवातीपासूनच पुर्ण क्षमतेने गाळप करीत आहेत. किसन वीर कारखान्याने ४२ दिवसांत २ लाख ८ हजार ५५0 मेट्रिक टन तर खंडाळा कारखान्याने ४४ दिवसात १ लाख २५ हजार ८५0 मेट्रिक टनाचे गाळप केलेले आहे. किसन वीरच्या को- जनरेशन प्रकल्पातून ४२ दिवसात १ कोटी ७१ लाख ८२ हजार युनिट वीज निर्मिती झालेली असून १ कोटी ८ लाख ९ हजार ४१७ युनिटची वीज एक्सपोर्ट करण्यात आलेली आहे.
खंडाळच्या को-जनरेशन प्रकल्पातून ४४ दिवसात८३लाख३० हजार युनिटची वीजेची निर्मिती झालेली असून ५० लाख १० हजार युनिटची वीज एक्सपोर्ट करण्यात आलेली आहे. किसन वीर व खंडाळा कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी क्षणिक भुलथापांना बळी न पडता संचालक मंडळाने ठेवलेले गळिताचे उद्दिष्ठ पुर्ण करण्याकरिता व दोन्ही कारखान्यांना पुर्वीप्रमाणे सुगीचे दिवस आणण्याकरिता आपला संपुर्ण ऊस कारखान्याला घालण्याचे आवाहन चेअरमन नामदार मकरंद पाटील, व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील व दोन्ही कारखान्याच्या संचालक मंडळाने केलेले आहे.--------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














