वन विभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा - शेतकऱ्यांची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, फुलंब्री प्रतिनिधी तातेराव बनसोडे
कन्नड तालुक्यातील भिलदरी शिवारात रानडुकरांनी मका पिकाचे मोठे नुकसान केले आहे. या नुकसानीचा पंचनामा बुधवारी दिनांक 3 सप्टेंबर रोजी वनरक्षक मोनाली फिरके, वन मजूर रतन मगरे, गावातील शेतकरी व उपसरपंच विजय वैष्णव यांच्या उपस्थितीत केला. पंचनामाचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवण्यात आला आहे.
यंदा पाऊस समाधानकारक असल्यामुळे मक्का, कापूस, तुर, अद्रक पीके जोमात आली आहेत. परंतु आता रानडुकरांचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे टाकले आहे. डोंगराळ भाग असल्याने रानडुकराच्या कळपाने अनेक शेतकऱ्यांची 75 टक्के पेक्षा अधिक प्रमाणात नुकसान केले आहे. नुकसान झालेल्या मग त्या पिकांना पाळीव प्राणी सुद्धा खात नाही, त्या पिकांना वास येत असल्यामुळे तो चारा उपयोगात येत नाही. शेतकरी दुहेरी अडचणीत सापडलेला आहे.
शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, व शेतांना तार कंपाऊंड साठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी बिल्दारी ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी केली आहे. अन्यथा वन विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे. कमल बम्हणावत, चंदन गोटवाल, जितेंद्र वैष्णव, सुभाष सुलाने, रामसिंग गोटवाल, आकाश वैष्णव, कार्तिक कवाळ या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














