अंजनासागर माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींनी मारली बाजी
कन्नड येथील गणेश महासंघ यांच्या वतीने कलावंताचा सोहळा हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात पळशी येथील अंजनासागर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बाजी मारली असून नृत्य कलेमध्ये जयश्री आणि समूह यांचा द्वितीय क्रमांक आला आहे. तर तनुजा आणि समूह यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकवला. या कार्यक्रमासाठी शाळेतील मुख्याध्यापिका स्मिता पवार , सचिन निकम, राजू डहाके, मातेरे,काकडे, यांनी त्या विद्यार्थिनींनामार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष श्री नारायणराव जाधव,सचिव सौ.सिंधुताई जाधव व सर्व अंजनासागर परिवार यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.
---------------------
-------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














