बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पोलीस बांधवांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
महाराष्ट्रा मध्ये अनेक जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने व महाराष्ट्र धर्म समजून आजपर्यंत राहत आहेत. समाजामधील विविध लोक आपल्या धर्म व जातीप्रमाणे अनेक उत्सव व सण साजरे करीत असतात.
त्याचबरोबर महाराष्ट्र मध्ये अष्टविनायका बरोबरच गणेश उत्सव हा सामाजिक व राष्ट्रीय ऐक्य चे प्रतीक असून महाराष्ट्रातील लाखो लोक गणेश चतुर्थीला गणरायाची स्थापना करून 'श्री' ची या काळात दररोज विधिवत पूजा करून आनंत चतुर्दशीला बाप्पांचं मोठ्या भक्तिमय व आनंदमय वातावरणात मिरवणुक काढून विसर्जन करतात. परंतु याच काळामध्ये हा उत्सव निर्विघ्न पार पाडण्याची जबाबदारी राज्य सरकार बरोबर गृह खात्यातील पोलीस प्रशासनाची असते. हा उत्सव सुरळीत पार पडावा म्हणून अनेक पोलीस प्रशासनाच्या विविध फोर्सेस बंदोबस्ताच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने तैनात असतात. याच माध्यमातून सामाजिक सेवेचे व्रत घेतलेले आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बापू सानप यांनीही सलग चौदा वर्ष आपल्या या माणुसकीचे दर्शन घडवत एक चांगला व आदर्शवत संदेश व उपक्रम समाजाला दिला आहे.
शिरूर सारख्या शहरांमध्ये व परिसरामध्ये अनेक गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्य, सजावटीचे रथ, जनसेटच्या गाड्या, डीजेच्या गाड्या अशा अनेक वाहनांच्या मिरवणुकी दरम्यान रांगा लागतात व त्यांना व्यवस्थित रस्त्यामध्ये कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये व वाहतूक सुरळीत पार पाडावी कुठल्या प्रकारचे वादविवाद होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र कष्ट घेत असते. परंतु पोलीस बांधव हा माणूस लोकांच्या नजरेतून काहीसा अलिप्त राहतो. अशा वेळी त्यांना बंदोबस्ताच्या ठिकाणी ११० फूड पॅकेज व पाण्याची व्यवस्था करून त्यांना सहकार्य करणे व त्यांचे मनोबल वाढवणे या हेतूने प्रेरित होऊन सलग १४ वर्षे अविरत हा उपक्रम आम्ही शिरूरकर फाउंडेशन व सहयोगी संघटना यांच्या माध्यमातून राबवला जात आहे.
या कामासाठी डी.वाय.एस.पी प्रशांत ढोले व शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची योग्य साथ व नियोजन यासाठी महत्त्वाची ठरली असून मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महबूब सय्यद, प्रवासी संघटनेचे अनिल बांडे, मनसेचे रवी लेंडे, एडवोकेट आदित्य मैड, पत्रकार फिरोज शिकलकर, गोपी पठारे, पत्रकार फैजल पठाण, विकास नागरगोजे, बंडू दुधाने, संदीप कडेकर, पप्पू औटी, राहुल निकुंभ, आशुतोष मिसाळ इत्यादी कार्यकर्त्यांनी या उपक्रमामध्ये स्वयंस्फूर्तीने सहकार्य व सहभाग घेतला.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














