लोकशाहीत पत्रकार आणि राज्यकर्ते हे शत्रू नसून एकमेकांचे हितचिंतक व मार्गदर्शक असतात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‌

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते मराठी पत्रकार संघाचा फिनिक्स पुरस्कार प्रदान

Chief minister Devendra fadnavis , Mumbai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, मुंबई (म.प.सं)

पत्रकार आणि राज्यकर्ते हे एकमेकांचे शत्रू नसून लोकशाहीचे खरे हितचिंतक आहेत. समाजासमोर सत्याचे सर्व पैलू मांडणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे, तर पत्रकारांना योग्य पाठबळ देणे हे राज्यकर्त्यांचे पहिले कर्तव्य आहे,” असा ठाम संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. 

मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेला फिनिक्स पुरस्कार स्वीकारताना ते मुंबईत बोलत होते. मुंबईतील यशवंतराव चव्हाण हॉलमध्ये हा भव्य सोहळा पार पडला. या वेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, एबीपी माझा चॅनेलच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक, सकाळ माध्यम समूहाचे संपादक निलेश खरे, लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर, पुढारीचे संपादक विवेक गिरधारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचे भाषण

सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,लोकशाही मजबूत ठेवायची असेल तर राज्यकर्त्यांनी टीकेला घाबरता कामा नये. टीकेसोबत सत्याची दुसरी बाजूही पत्रकारांनी निडरपणे मांडली पाहिजे.

पत्रकारितेमुळे राज्यकर्त्यांना दिशादर्शन मिळते. म्हणूनच पत्रकारांना आधार देणे हे कोणत्याही सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे.

विरोधकांना जेव्हा वाटत होते की, मी राजकारणात संपलो आहे, तेव्हा मी सकारात्मकतेने काम करत राहिलो. त्यातूनच मला पुन्हा संधी मिळाली आणि भरारी घेता आली.

हा पुरस्कार स्वीकारताना मला आनंद होत आहे कारण तो माझ्या कामगिरीपेक्षा लोकांच्या विश्वासाचा सन्मान आहे.

श्री श्री रविशंकर यांचे मत

आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री श्री रविशंकर म्हणाले, “टीका आणि प्रशंसेचा समतोल साधणारा माणूसच जगाच्या कौतुकास पात्र ठरतो. देवेंद्र फडणवीस यांना हा पुरस्कार देऊन मराठी पत्रकार संघाने योग्य व्यक्तीची निवड केली आहे. परंतु पुढील वर्षी हा पुरस्कार देताना पत्रकार संघाचा कस लागणार आहे, कारण फडणवीस यांना सन्मान देऊन त्यांनीच एक उच्च मापदंड निर्माण केला आहे.”

कार्यक्रमातील इतर ठळक मुद्दे

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी प्रास्ताविक करून पत्रकार संघाची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या विशेष व्हिडिओ बुकचे प्रकाशन झाले. विविध मान्यवरांचे मनोगतही व्हिडिओ संदेशाद्वारे प्रदर्शित जलपूजनाने कार्यक्रमाची सुरूवात देशातील प्रमुख ११ नद्यांच्या पाण्यांनी भरलेल्या जलकुंभांचे श्री श्री रविशंकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते पूजन करून नदी व पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मराठी पत्रकार संघाचे संघटक संदीप पारोळेकर, सचिव हरीभाऊ प्रक्षाळे, विवेक इनामदार, डॉ. शिबू नायर, अनिल माने, पंकज बिबवे यांच्यासह पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केले.फोटोओळी - 1) मराठी पत्रकार संघाच्या वतीने मुंबईत झालेल्या शानदार कार्यक्रमात श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फिनिक्स पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

त्यावेळी डावीकडून सरिता कौशिक, नीलेश खरे, विजय बाविस्कर, श्री. श्री. रविशंकर, देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा, किरण जोशी. 2) मराठी पत्रकार संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काढलेल्या ई-बुकचे प्रकाशन करताना डावीकडून सरिता कौशिक, नीलेश खरे, विजय बाविस्कर, श्री. श्री. रविशंकर, देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा, विवेक गिरीधारी व किरण जोशी ३) मराठी पत्रकार संघ आयोजित फिनिक्स विशेष सन्मान सोहळ्याचा शुभारंभ ११ नद्यांच्या जलपूजनाने झाला. त्यावेळी डावीकडून निलेश खरे, विजय बाविस्कर, श्री श्री रविशंकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विवेक गिरीधारी, किरण जोशी 


---------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !