विविध धार्मिक कार्यक्रमांचे केले आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून शनिवार दि. 9,10 व 11 रोजी जांब तालुका वाई येथे श्री भैरवनाथ आणि श्री. जोगेश्वरी देवी,श्री विठ्ठल रुक्मिणीमूर्ती प्राणप्रतिष्ठापना समारंभा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
शनिवार दि 9 रोजी गुढी उभारणी गणेश अंबिका पूजन संकल्प विधि श्री भैरवनाथ श्री जोगेश्वरी देवी व श्री विठ्ठल रुक्माई मूर्तीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे रविवार दिनांक 10 रोजी कुलदैवत पूजन अष्ट भैरवनाथ पूजन व चिलाई देवी भजनी मंडळ यांचा भजन सेवा कार्यक्रम तसेच सोमवार दिनांक अकरा रोजी प्राणप्रतिष्ठा महारुद्र अभिषेक,विठ्ठल महाभिषेक तुलसी पूजन होणार आहे.
किर्तन ह.भ.प माऊली महाराज मांढरे सोनी मराठी टीव्ही कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकारअंतिम फेरी व वेदमूर्ती रामदास बाबर गुरुजी व त्यांचे सहकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून काळभैरवनाथ गोंधळ व महाप्रसाद भजन सेवा होणार आहे तरी या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान ग्रामस्थ मंडळ जांब यांनी केले आहे
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा