प्रदर्शन थांबवण्याची शिवप्रेमींची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, पुणे (प्रतिनिधी पारस मुथा)
खालिद का शिवाजी या आगामी हिंदी चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर वादाला तोंड फोडले आहे. या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित अनेक ऐतिहासिकदृष्ट्या बिनबुडाचे आणि अप्रमाणित दावे करण्यात आल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३५ टक्के मुसलमान होते. महाराजांचे ३५ पैकी ११ अंगरक्षक मुसलमान होते. महाराजांनी रायगड किल्ल्यावर मशिद बांधली होती. असे प्रमुख दावे ट्रेलर मध्ये केलेली दिसत असून त्याला शिवप्रेमींनी आक्षेप घेतला आहे.
हे दावे ऐतिहासिक सत्याशी विसंगत असून, अशा कोणत्याही गोष्टींसाठी ठोस पुरावे अद्याप उपलब्ध नसल्याचे अनेक इतिहासतज्ज्ञ आणि अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे या चित्रपटामधून समाजात इतिहासाबाबत चुकीची माहिती पसरवण्याचा आणि नव्या पिढीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
शिवप्रेमी संघटनांनी या संदर्भात तीव्र आक्षेप नोंदवला असून, चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक यांनी या दाव्यांना आधारभूत पुरावे न दिल्यास हा चित्रपट कोणत्याही माध्यमातून प्रसारित होऊ नये, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
या ट्रेलरमधूनच जर इतकी ऐतिहासिक विकृती समोर येत असेल, तर संपूर्ण चित्रपट अधिकच दिशाभूल करणारा ठरू शकतो, असा इशाराही यावेळी देण्यात आला. त्यामुळे या चित्रपटाची चौकशी करून तो त्वरित रोखण्याची मागणी देशभरातील शिवप्रेमींनी एकमुखाने केली आहे.
---------------------
-------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा