आरोपीवर दाखल आहेत मोकासारखे गंभीर गुन्हे
मंगळसूत्र चोरीसह विविध गंभीर गुन्ह्यांतील आरोपी पोलिसांच्या गोळीबारात ठार झाल्याची बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी सातारा येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेवर कोयता उगारून तिचे मंगळसूत्र चोरल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील आरोपी लखन पोपट भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मोका सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सातारा पोलीस त्याचा शोध घेत असताना तो शिक्रापूर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला अटक करायला सातारा पोलीस गेले तेव्हा त्याने पोलिसांवर चाकू हल्ल्या करण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी ठार झाल्याचे समजले आहे. पुण्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या झटापटीत एका पोलीस जवानाला गुप्ती लागली असल्याची माहिती समोर आली आहे.
---------------------
-------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा