गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शैक्षणिक साहित्य देऊन शोभा मूर्ती यांनी दिला आदर्श - गटशिक्षणाधिकारी हर्षवर्धन मोरे

गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची वाटप 

Distribution of school supplies to students, Wai, Satara, Shivshahi News,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहारे शाळेस श्रीम. शोभा मूर्ती (आरंभ संस्था नवी मुंबई) यांच्या सहकार्यातून सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप मा. श्री हर्षवर्धन मोरे गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले .कायमस्वरूपी गरजू व होतकरू मुले यांना योगदान व तालुक्यात उत्तम प्रकारे सहकार्य असल्याचे गौरवउद्धार हर्षवर्धन  मोरे यांनी स्पष्ट केले .सर्व मुलांनी लहानपणापासूनच आपण मोठे होईपर्यंत कोणाकडूनही शिकत असतो मीही आई-वडील ते आज पर्यंत शिकत आहे सर्वांनी खूप खेळा, आनंदी राहा, आरोग्य उत्तम ठेवा ,भरपूर अभ्यास करा . मराठी शाळा तुम्हाला जडणघडणीतून आदर्श नागरिक म्हणून नावारूपाला आणतात. आपली शाळा आदर्श शाळा म्हणून सर्व सुविधांवर होत आहे तरी हे  ज्ञान मंदिरासाठी सर्वांनी एकजुटीतून प्रयत्नशील राहावे

 शिक्षण विस्तार अधिकारी साईनाथ वाळेकर  यांनी सर्व स्पर्धा परीक्षा, विविध योजनांचा लाभ मुलांना द्यावा शाळेस प्रिंटर व शैक्षणिक किट दिल्या बाबत कौतुक केले . देवकुमार यादव केंद्रप्रमुख यांनी गुरुपौर्णिमेचे महत्व लहानपणापासून आपली जडणघडण होत एक आदर्श होत असते याचे महत्त्व विशद केले . मुख्याध्यापक शेखर हणमंत जाधव  यांनी प्रास्ताविकातून शालेय उपक्रम व शोभामूर्ती मॅडम यांचे योगदान व शाळा आदर्श होणे बाबत विद्यार्थी पालक, ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आदर्श संकुल शतकपूर्तीच्या वाटचालीस उभारेल असे नमूद केले . पोतदार यांनी सेमी इंग्रजी शालेय उपक्रम व गुणवत्ता याबाबत शाळेचे योगदान विशद केले .कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राम सुतार, उपाध्यक्ष  प्राजक्ता भोईटे,   नवनाथ  शिंदे , रफिक डांगे, मनीषा बाबर , शिल्पा ढेकाणे. मनिषा बाबर, सचिन भिलारे.  प्रेमा भिलारे ,राजेंद्र शेलार, अश्विनी कोचळे अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ पालक उपस्थित होते .कार्यक्रमाचे नियोजन  निर्मला शिंदे यांनी केले व धनाजी जेधे यांनी आभार मानले.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !