स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना घेतले ताब्यात - मुख्य सूत्रधार मात्र फरार
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
दि. १९ जून २०२५ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १२.२० वा. पर्यंत साक्षी हाईटस, सी १६ सहयाद्रीनगर, ता. वाई जि. सातारा येथे फिर्यादी यांचे राहते घरात अज्ञात चोरटयांनी फ्लॅटच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करुन मुद्दाम लबाडीने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय बेडरुममधील लाकडी कपाटाचे लॉकर तोडून २,१७,०००/-रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरी केले होते. सदर बाबत वाई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक सातारा तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा डॉ. वैशाली कडुकर यांनी गुन्हा तपासकामी स्थानिक गुन्हे शाखा सातारा येथे वर्ग केला, व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा अरुण देवकर यांना गुन्हयातील अज्ञात आरोपींबाबत माहिती प्राप्त करुन गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांच्या अधिपत्याखाली तपास पथके तयार करुन त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.
तपास पथकांनी गुन्हयाच्या घटनास्थळी वेळोवेळी भेटी देवून फिर्यादी, साक्षीदार व आजुबाजूच्या लोकांच्याकडे कौशल्याने तपास केला, घटनास्थळ परिसरात तांत्रिक तपास करुन गोपनिय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा पोलीस अभिलेखावरील आरोपी लोकेश रावसाहेब सुतार रा. लिंगनोर ता. मिरज जि. सांगली याने केला असल्याचे निष्पन्न केले. त्या अनुशंगाने तपास पथक आरोपीच्या ठावठिकाण्याबाबत माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत होते.
दि.२४ जून २०२५ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना पोलीस अभिलेखावरील आरोपी लोकेश रावसाहेब सुतार याने सदरचा गुन्हा त्याच्या दोन साथिदार यांचे मदतीने केला असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली. तसेच दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्याबाबत तपास पथकास सुचना दिल्या. तपास पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेवून त्यांची मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाई यांचेकडून पोलीस कोठडी मंजूर करुन घेवून पोलीस कोठडी मुदतीत त्यांचेकडे सखोल तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे तसेच वाई व सातारा तालूका पोलीस ठाणे हद्दीत देखील घरफोडी चोरी केले असल्याचे सांगीतल्याने त्यांच्या कडून घरफोडी चोरीचे एकूण ४ गुन्हे उघड करुन नमुद गुन्हयात चोरीस गेलेले २३,०४,०००/- रुपये किमतीचे २४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे हस्तगत करण्यात आलेले आहेत.
पोलीस अधीक्षक सातारा तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा वैशाली कडुकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांचळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित सपकाळ, अमित माने, अरुण पाटील, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, हसन तडवी, मुनीर मुल्ला, मोहन पवार, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, रवि वर्णेकर, पृथ्वीराज जाधव, प्रविण पवार, संकेत निकम, शिवाजी गुरव यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक सातारा तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा डॉ. वैशाली कडुकर यांनी अभिनंदन केले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा