महाबळेश्वर तालुका अध्यक्षपदी राजेंद्र बावळेकर
शिवशाही वृत्तसेवा, वाई प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई , खंडाळा , महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षपदी मयुर नळ व महाबळेश्वर तालुका अध्यक्षपदी राजेंद्र बावळेकर यांची निवड करण्यात आली.
या नियुक्ती पक्षप्रमुख राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांचे नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. २०१४ साली मयुर नळ यांना मनसे चे अधिकृत उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढण्याची संधी मिळाली होती
येणाऱ्या काळात जिल्हा परिषद , पंचायत समिती , नगरपालिका ग्रामपंचायत निवडणूका महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण ताकतीने जिल्हा अध्यक्ष युवराज पवार यांच्या नेतृत्वाखाली लढणार असून पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांनी कामाला लागावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष युवराज पवार यांनी केले
यावेळी वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष राहुल शेडगे , जिल्हा उपाध्यक्ष कुमार फाळके , जिल्हा उपाध्यक्ष अमोल गरड , जावली तालुका अध्यक्ष अविनाश दुर्गावळे , कोरेगाव तालुका अध्यक्ष सागर बर्गे , खंडाळा तालुका अध्यक्ष इरफान शेख , व सौरभ झेंडे , महाबळेश्वर शहर अध्यक्ष राजेंद्र शिंदे , महाबळेश्वर महिला आघाडी रानीताई शिंगरे, तसेच महाराष्ट्र सैनिक सार्थक कोंढाळकर , दीपक भडंगे , वैभव जाधव , इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा