योगेश फाळके यांच्या मागणीला यश
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई शहरातील खड्ड्यांच्या समस्येविषयी त्याच्या दुरुस्ती व्हावी या संदर्भात युवा सेना शिवसेना विधानसभा वाई-खंडाळा-महाबळेश्वर (एकनाथ शिंदे गट) प्रमुख योगेश फाळके यांनी पुढाकार घेतला. वाई नगरपरिषद मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांना शहरातील रस्त्यांच्या समस्या विषयी निवेदन देण्यात आले होते.
या निवेदनात असे सांगितले होते की वाई नगरपरिषद हद्दीतील महाराणा प्रताप चौक तसेच शहरातील इतर प्रमुख रस्त्यांवर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून, नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीस व सुरक्षिततेस मोठा धोका निर्माण झाला आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनाही घडण्याची शक्यता नाकारता येत निवेदनात असंही म्हटलं गेलं की खड्ड्यांबाबत तातडीने दखल घ्यावी व युद्धपातळीवर कारवाई करावी.
सदर पत्राच्या अनुषंगाने वाई नगरपरिषदेने दखल घेत. खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले. अनेक ठिकाणी रस्त्यातील खड्डे बुजवण्यात आले आहेत.योगेश फाळके यांच्या मागणीला अखेर यश आल्याचे पहावयास मिळत आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा