शिवपाणंद चळवळीच्या वतीने तहसीलदार बाळासाहेब मस्के त्यांचा सत्कार

तालुक्यासाठी तब्बल 105 रस्त्यांचा काढला आदेश

Tehsildar Balasaheb Maske felicitated, Shirur, Pune, Shivshahi News,

शिवशाही वृत्तसेवा, शिरूर प्रतिनिधी फैजल पठाण  

दि. 11 जुलै रोजी शिरूर तहसील कार्यालय या ठिकाणी तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी घेतलेल्या धडाडीच्या निर्णयामुळे तसेच त्यांच्या कामाचे  तालुक्यामधून विशेष कौतुक होत असून शिवपाणंद चळवळी च्या वतीने त्यांचा एक आगळा वेगळा सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी महसूल तसेच पोलीस प्रशासनातील अनेक अधिकारी उपस्थित होते. तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी तालुक्यासाठी 105 रस्त्यांचा आदेश काढीत, शिरूर तालुक्यातील आदर्शवत अशा सहा गावांनी रोड व्हिलेज  मॉडेल ची ग्रामसभेचे ठराव या ठिकाणी घेण्यात आले. 

हे आदर्श आणि प्रेरणादायी काम आहे यासाठी अनेक शेतकऱ्यांनी निस्वार्थपणे यामध्ये योगदान दिलेले आहे तसेच तालुक्यातील भूमी अभिलेख, बी डि ओ, तहसीलदार, पोलीस प्रशासन, सगळ्यांनी एकत्र येत समन्वय घडवला यापूर्वी प्रशासनाचा ताळमेळ बसत नसल्यामुळे अर्ज देऊन सुद्धा कामे प्रलंबित राहायचे आणि विस्कळीतपणा यायचा परंतु  चळवळ आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून समन्वय साधल्यामुळे आज त्याला एक चांगले स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे एक ऐतिहासिक काम शिरूर तालुका मध्ये होताना दिसत आहे. राज्यासाठी शिरूर तालुका हा मॉडेल म्हणून येणाऱ्या भविष्यकाळात लोक पाहतील. 

या सर्व कामासाठी पोलीस प्रशासन, भूमी अभिलेख, तहसीलदार सर्वांचे योगदान मिळेल अशी ग्वाही या कार्यक्रमांमध्ये प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. रोड व्हिलेज च्या माध्यमातून गावामध्ये समन्वयातून रस्ते खुले होणार आहेत ,गाव पातळीवर नकाशे तयार होतील, त्यामुळे शिवार फेरी, ग्रामसभा, पिडीत शेतकऱ्याला रस्ता मिळण्यास मदत होईल लोक सहभागातून अनेक प्रश्न मार्गी लागतील. शेतीचा श्वास हा शेत रस्ता आहे तो खुला होणार आहे. समृद्ध महाराष्ट्राचा आणि समृद्ध शेतकऱ्यांचे स्वप्न काही दिवसानंतर पाहायला मिळेल. रस्त्यांचे प्रश्न सुटल्या नंतर अनेक तरुण युवक शेतीमध्ये अनेक उद्योग व्यवसाय उभारू शकतील. व येणाऱ्या काळात भारत हा विश्वगुरू असेल. तरच शेतकरी हा खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंद आहे हे सत्यात उतरेल अशी यावेळी शिवपाणंद चळवळीचे जनक शरद पवळे सांगितले.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !