शहराध्यक्ष प्रितेश फुलडाळे यांचे तहसीलदार यांना निवेदन
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
दशक्रिया विधी घाट येथे नाभिक समाजासाठी केस कर्तन विधी मुंडन करण्यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवार २८ रोजी शिरुर तहसिल कार्यालय येथे प्रतिकात्मक मुंडन आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते व शिरूर शहर नाभिक संघटनेचे शहराध्यक्ष प्रितेश फुलडाळे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
यावेळी शिरूर शहर नाभिक संघटनेचे मा.शहराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे,मा.शहर उपाध्यक्ष गोरक्ष शिंदे,मा.शहर उपाध्यक्ष अजय गायकवाड,मा.शहराध्यक्ष संतोष शिंदे,बबन वाघमारे यांसह उपस्थित होते.
शिरुर शहरातील दशक्रिया विधी घाट येथे केस कर्तन विधी मुंडन करण्यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवार २८ जुलै २०२५ रोजी शिरुर तहसिल कार्यालय येथे दुपारी साडेबारा वाजता या वेळेत मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे.दशक्रिया विधी घाट येथे नाभिक समाजाने अनेक वेळा मागणी करुनही दशक्रिया विधी घाट येथे केस कर्तनालयासाठी रुम,बैठक व्यवस्था,कट्टे,कायमस्वरुपी पाणी,लाईटसह सोयी-सुविधा करुन देण्याच्या मागणीकडे शिरूर नगरपरिषद प्रशासनाकडुन दुर्लक्ष होत असल्याने येथे केस कर्तन करताना नाभिक बांधवांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे.या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रतिकात्मक मुंडन आंदोलन करण्यात येणार असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा