गुजर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली अनोखी निवडणूक प्रक्रिया

विद्यार्थ्यांनी अनुभवली लोकशाहीची सर्वात महत्त्वाची प्रक्रिया

Students of Gujar Prashala experienced a unique election process,  Shirur, Pune, Shivshahi News,

शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)

तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत शालेय सार्वत्रिक निवडणूक 2025 दिनांक 11 जुलै 2025 रोजी विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखालीउत्साहात संपन्न झाली.

सार्वत्रिक निवडणूक व मतदान प्रक्रिया लोकशाही प्रशासनाचा आत्मा आहे. नागरिकत्वाचे व लोकशाही तत्त्वांचे ज्ञान शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना मिळावे या हेतूने स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशाला शालेय सावत्रिक  निवडणुकी द्वारे लोकशाही मतदान प्रक्रियेचा उपक्रम राबवला.

सार्वत्रिक मतदानाची डिजिटल प्रतीकात्मक यंत्रणा यावेळी उभी करण्यात आली. प्रत्यक्ष वोटिंग मशीन द्वारे मतदान, मतमोजणी, निकालाची घोषणा अशी व्यवस्था होती. त्यासाठी त्रयस्थ वर्गातील विद्यार्थी निवडणूक अधिकारी केंद्राध्यक्ष म्हणून नेमले होते. निवडणूक आयोग सदृश  डिजिटल मतदान यंत्रणेचा मोबाईल ॲप द्वारे यावेळी उपयोग करण्यात आला. 

प्रशालेतर्फे इयत्ता दहावीच्या वर्गातील या विद्यार्थ्यांना उमेदवारी

1.माळवदकर श्रावणी 

2.सपकाळे प्रिया 

3.हळंदे सृष्टी 

4.कुशवाह आरती 

5.निंबोडे मयुरी 

6.कुंभार यश 

7.मांढरे साईराज 

8.शिंदे साहिल 

9.सूर्यवंशी साई 

10.भुजबळ सुरज 

11.ढवळे रुद्राणी 

12.भुजबळ श्रावणी 

13.ठोंगे स्वराज 

14.राठोड श्रुती 

15.कांबळे प्राची 

स्वाध्याय, पाठांतर ,सुव्यवस्था, शिस्त, समन्वय ,उपक्रमात मदत करणे अशा जबाबदाऱ्या त्यांच्याकडे देण्यात आलेल्या आहेत. प्रशालेचे शंकर उकले यांनी निरीक्षकाची भूमिका बजावली. 

 या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे यशस्वी आयोजन प्रशालेत अतिशय नियोजनबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पडले. उमेदवारी अर्ज भरणे, अर्ज छाननी, चिन्ह वाटप, प्रचार, जाहीर सभा, आचारसंहिता पालन, पोलिंग बूथ तयार करणे, मतदान अधिकारी नेमणूक, ओळखपत्रासह झालेलं मतदान आणि विशेषतः कंट्रोल युनिट च्या माध्यमातून पारदर्शकतेने झालेली विद्यार्थ्यांची मतदान प्रक्रिया — हे सारेच अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पार पडलं.

या संपूर्ण प्रक्रियेत शाळेतील प्रशासन, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचं होतं. यामुळे निवडणूक प्रक्रियेत शिस्त, पारदर्शकता आणि एक आदर्श असा मिलाफ दिसून आला.

निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना शपथविधी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत  सातपुते, मानद सचिव अरविंद ढमढेरे, संचालक महेश ढमढेरे यांच्या कडून करून मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. हे विद्यार्थ्यांसाठी गौरवाचे आणि प्रेरणादायी क्षण ठरले.

या सर्व प्रक्रियेसाठी प्रशालेतील सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अविनाश कुंभार प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या निवडणुकीचे काम पाहिले तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तम मेहनत घेतली. 

खालील प्रमाणे शालेय सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया राबवली

1. उमेदवारी अर्ज भरणे 

2. अर्जांची छाननी करणे उमेदवारी वैद ठरवणे 

3. माघार घेणे 

4. प्रचार करणे 

5. मतदान प्रक्रियेसाठी पोलिंग पार्टी नेमणूक 

6. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिये वेळी ओळख पटविणे 

7. मतदार चिठ्ठ्या देणे 

8. बॅलेट सोडणे 

9. मतदान कक्षात जाऊन मशीनद्वारे प्रत्यक्ष मतदान करणे 

10. मतदान प्रक्रियेनंतर रिझल्ट बटन दाबून प्रतिनिधी व उमेदवारांना पडलेली मतांची संख्या दाखवून निकाल जाहीर करणे.

या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रशालेची विद्यार्थिनी सृष्टी हळंदे हिची मुख्यमंत्री म्हणून तर सुरज भुजबळ या विद्यार्थ्यांची उपमुख्यमंत्री म्हणून बहुमताने निवड झाली व उर्वरित सर्व उमेदवारांना प्रशालेतील वेगवेगळ्या समित्यांचे खाते वाटपही करण्यात आले.

या अनोख्या शालेय सार्वत्रिक निवडणूक 2025 चे शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर मानद चिव अरविंद ढमढेरे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी कौतुक केले व अशा विविध उपक्रमांसाठी प्रशालेला व विद्यार्थ्यांना सदिच्छा व शुभेच्छा दिल्या

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !