शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले सात मोबाईल फोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश

सुमारे तीन लाख 90 हजार किमतीचे मोबाईल फोन हस्तगत

Police seize seven mobile phones, Wai, Satara, Shivshahi News,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे )

शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले सात मोबाईल फोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. सातारा पोलीस अधीक्षक  तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी  राहुल धस , शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हरवलेले मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी शिरवळ पोलीस ठाणेचे डी.बी. पथकास सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुशंगाने डी.बी. पथकातील पोलीस स्टाफने सी.ई.आर. पोर्टल व तांत्रीक बाबीचे आधारे महाराष्ट्रातुन वेगवेगळ्या जिल्हयातुन हस्ते परहस्ते वारंवार संपर्क करुन चिकाटीने सदरची मोहिम राबविल्याने शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले एकुण ७ मोबाईल फोन किंमत १,०८,०००/- रुपयेचे स्मार्ट मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश आले असुन सदरची मोहीम वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार असल्याचे शिरवळ पोलीस निरीक्षक याशवंत नलावडे यांनी सांगीतले आहे.

तसेच शिरवळ पोलीस ठाणे  गुन्हा उघडकीस आणुन त्याचे तपासा दरम्यान जप्त करण्यात आलेले वगवेगळया कंपनीचे एकुण किंमत ३,९०,०००/- रुपयेचे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. सदर जप्त मोबाईल फोन परत मिळणे करीता गुन्हयातील फिर्यादी मयुर शिंदे यांनी मा. न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याप्रमाणे मा. न्यायालयाने सदर जप्त मुद्देमाल फिर्यादी यांना परत करण्याचे आदेशीत केले आहे. तरी सदरचा मुद्देमाल आज रोजी त्यांना परत करण्यात आला आहे.

सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक सातारा तुषार दोषी,  अप्पर पोलीस अधीक्षक सातारा वैशाली कडुकर,  उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग फलटण राहुल धस, पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुद्देमाल कारकुन स.पो.फी. सुर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा सचिन वीर, पो.कॉ. सुरज चव्हाण, अजित बोराटे, मंगेश मोझर, अक्षय बगाड, यांनी केलेली आहे. सदरच्या उल्लेखनिय कामगीरीबाबत शिरवळ पोलीस ठाणेचे सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे  पोलीस अधीक्षक सातारा तुषार दोषी,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी अभिनंदन केले आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !