वाई पोलीस ठाण्यातील एक पोलीस उपनिरीक्षक व एक हवालदार असे दोन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

पंधरा हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Police in custody of Anti-Corruption Department, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बिपीन बाळकृष्ण चव्हाण व पोलीस हवालदार उमेश दत्तात्रय गहिण या दोघांना पंधरा हजार रुपयांची लाच घेताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

तक्रारदार याने वाई पोलीस ठाण्यात त्याच्याविरूद्ध महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सामूहीक अत्याचाराचा गुन्हा दाखल न करणेकरीता लाच मागितली असल्याची तक्रार एसीबी कडे केली होती. मागणी होत असलेल्या लाच मागणीबाबत दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ४ जुलै २०२५ रोजी वाई पोलीस ठाण्याच्या आवारात केलेल्या पडताळणीमध्ये पोलीस हवालदार गहिण याने उपनिरीक्षक चव्हाण याच्याकरीता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदारावर गुन्हा दाखल न करणेकरीता पंचासमक्ष रूपये २० हजाराची लाच मागणी करून तडजोडीअंती १५ हजार रूपये लाच रक्कम स्विकारताना प्रशासकीय इमारतीमधील पोलीस ठाण्यात बीट अंमलदार कक्षात सापळा लावला. उपनिरीक्षक चव्हाण व हवालदार गहिण याच्या समवेत तक्रारदार याच्याशी पंचासमक्ष झालेल्या पडताळणीमध्ये तक्रारदारास शिवीगाळ दमदाटी करून हाताने चापटी मारून अटक करण्याची भिती दाखवून लाच मागणीस प्रोत्साहन दिले.

तक्रारदाराने लाच मागणीस होकार दर्शवताच त्यास सांगेल, तेव्हा साक्षीदार व्हायचं असे बोलून हवालदार गहिण याचे लाच मागणीस प्रोत्साहन दिले. सदर लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. ही कारवाई सातारा लाच लुचपत विभागाचे उपनिरीक्षक राजेश वाघमारे, पोलीस हवालदार नितीन गोगावले, गणेश ताटे, निलेश राजपुरे यांनी केली. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे करीत आहेत

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !