छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान शिबिर मोठ्या उत्साहात
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
गोपाळ समाज व कातकरी समाज अशा अनेक मागासवर्गीय समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियान शिबिरा अंतर्गत विविध योजनांचा लाभ मोफत मिळवून देण्याकरता सरकारी दाखले आधार कार्ड रेशन कार्ड शेतकरी ओळखपत्र जातीचे दाखले याकरता या शिबिराचे आयोजन करण्यात आले
उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे साहेब, वाई तहसीलदार सोनाली मिटकरी, निवासी नायब तहसीलदार श्रीमती यादव मॅडम, महसूल नायब तहसीलदार भाऊसाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणराव पवार सभागृह खडकी तालुका वाई येथे बुधवार दि.16 रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या
भुईंज मंडल अधिकारी सौ ललिता कोरडे, संजय गांधी महसूल सहाय्यक श्रीमती रेश्मा गायकवाड, ग्राम महसूल अधिकारी भुईंज मोहन जाधव, ग्राम महसूल अधिकारी जांब निलेश जाधव, ग्राम महसूल अधिकारी काळंगवाडी अधिक कदम, ग्रामविकास अधिकारी खडकी सागर माळेकर, कृषी सहाय्यक खडकी जगताप, ग्राम विकास अधिकारी खडकी अनगळ यांच्या एकूण बारा गावांना वारस नोंददाखले 10 उत्पन्नाचे दाखले 20 जातीचे दाखले आठ सातबारा दाखले 75 दाखले आठ अ 35 शेतकरी ओळखपत्र पाच ग्रामपंचायत दाखले 18 चौकशी अहवाल 52 रेशन कार्ड नाव वगळणे 28 संजय गांधी योजना अर्ज तीन आधार कार्ड 18 असे एकूण 330 दाखल्यांचे वाटप मोफत या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आली याप्रसंगी खडकी चांदवडी भिवडी व इतर परिसरातील ग्रामस्थ व कातकरी व गोपाळ समाज बांधव उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा