वारकऱ्यांची सेवा हिच विठ्ठल रुक्मिणी सेवा - डॉक्टरांची भावना
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
सुपा परिसरातील जवळजवळ सर्व दिंडीतील वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी सुप्यातील जवळजवळ सर्वच डॉक्टर गेलेले होते. डॉक्टर शत्रुघ्न मगर, डॉक्टर बाळासाहेब पठारे,डॉक्टर सुभाष डेरे,डॉक्टर श्रीकांत मेहत्रे,डॉक्टर सुशील पादिर,डॉक्टर हनुमंत घायाळ डॉक्टर अजय येणारे या सुपा व सुपा परिसरातील डॉक्टरांनी वारकऱ्यांना आरोग्य सेवा दिली. याबद्दल दिंडीतील सर्वच वारकऱ्यांनी डॉक्टरांप्रती अतिशय चांगली भावना व्यक्त करून डॉक्टरांचे आभार मानले.
दिंडीतील वारकरी गेल्या सात ते आठ दिवसापासून दिंडीमध्ये रोज वीस ते पंचवीस किलोमीटर चालत आहेत. त्यामुळे वारकऱ्यांच्या ज्या काही आरोग्याच्या समस्या आहेत,त्या सोडवण्यासाठी सुप्यातील डॉक्टर गेलेले होते व त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे वारकऱ्यांची आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे.त्याबद्दल दिंडीतील सर्व भाविक व वारकरी यांनी डॉक्टर मंडळींचे आभार मानले आहेत. सुप्यातील सर्व डॉक्टर गेले तीन वर्षे झाले,अशीच आरोग्यसेवा देण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने दरवर्षी जातात. सुप्यातील डॉक्टरांनी शहांजपूर ची दिंडी,सुप्यातील दिंडी,वाळवणेतील दिंडी व पिंपळनेर येथील संत निळोबाराय देवस्थानच्या दिंडीला आरोग्यसेवा दिलेली आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा