कार्यक्षम नेतृत्वाचे मूर्तिमंत उदाहरण
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
विद्यावर्धिनी संस्था संचलित ज्ञानदीप स्कूल व ज्युनिअर कॉलेज चे अध्यक्ष, ज्ञानदीप बँकेचे ज्येष्ठ संचालक मा. एकनाथ जगताप यांचा ६९ वा वाढदिवस वाई येथे स्नेहपूर्ण आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
शिस्तप्रिय, दूरदृष्टी आणि कार्यक्षम नेतृत्वाचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या मा. एकनाथ जगताप साहेबांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली ज्ञानदीप स्कूल व कॉलेज शैक्षणिक गुणवत्तेची सातत्याने यशदायक व सामाजिक बांधिलकीची उजळ वाटचाल करत आहे.
साहेबांच्या समर्पित मार्गदर्शक कार्यामुळे स्कूल व ज्युनिअर कॉलेजची बोर्ड परिक्षेतील 20 व्या वर्षी 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे. 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' उपक्रमात सलग दोन वर्षे अव्वल, स्कॉलरशिप परिक्षेतही गुणवत्ता यादीत मुले चमकली आहेत. क्रीडा स्पर्धा व विविध विषयांच्या स्पर्धा परीक्षेतही राज्य, राष्ट्रीय स्तरावर यश मिळविले आहे. तसेच भौतिकसुविधा उत्तम केल्या आहेत. अद्यावत मिनी ऑलम्पिक दर्जाचा जलतरण तलावाचे काम ही प्रगतीपथावर आहे.
साहेबांच्या सहकार्य मार्गदर्शनामुळे अनेक तरूणांना संस्थाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे.तसेच साहेबांच्या विशेष सहकार्यातून कवठे गावात अनेक विधायक सामाजिक कामे उभी राहिली आहेत.शाळा, कॉलेज वसतीगृह तसेच ज्ञानदीप बँकेच्या प्रगतीची चौफेर वाटचाल सुरू आहे.
यावेळी संस्थेचे माजी सचिव व विश्वस्त प्रा.दत्तात्रय वाघचवरे यांनी अध्यक्ष जगताप साहेबांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे शाळेच्या विकासाला गती कशी मिळाली याबद्दलची माहिती दिली. संस्थेच्या प्रगतीमध्ये साहेबांचे योगदान अतिशय मोलाचे आहे असे त्यांनी सांगितले.
ज्ञानदीप सोसायटीचे संचालक अनुप पवार, मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण चव्हाण ,डॉ.वृषसेन पोळ, माजी उपसरपंच संदीप डेरे आदी मान्यवरांनी साहेबांच्या कार्याविषयी आपल्या मनोगतातून माहिती दिली.
कार्यक्रमासाठी विद्यावर्धिनी संस्थेचे विश्वस्त व माजी अध्यक्ष श्री दिलीप चव्हाण, माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर , ज्ञानदीपच्या प्राचार्या शुभांगी पवार , श्रीरंग शिर्के, बाळासाहे घाडगे, मुरलीधर पोळ, विजय डेरे, राजेंद्र पोळ, संजय शिर्के, हर्षल कदम , सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विकास अधिकारी सुरेश खरात, यशस्वी बांधकाम व्यावसायिक सुनिल संकपाळ, सचिन लेंभे , शिवराज वरे , तसेच ज्ञानदीप पतसंस्थेचे अधिकारी कर्मचारी व दैनंदिन ठेव प्रतिनिधी, ज्ञानदीप स्कूल व कॉलेज चे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,तसेच ग्रामस्थ कवठे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ज्ञानदीप स्कूलचे माजी विद्यार्थी चेतन अनपट व धीरज यादव यांनी सी ए परीक्षेत यश संपादन केले बद्दल अध्यक्ष जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना जगताप म्हणाले ज्ञानदीप पतसंस्था असो किंवा स्कूल असो येथे प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे कौतुक केले जाते.दोन्ही संस्थांचे कर्मचाऱ्यामुळेच संस्था प्रगतीपथावर असल्याचे सांगून प्रवासात साथ दिल्याबद्दल पत्नी पुष्पा जगताप,मुलगा व सुन, व अमित जगताप, ज्ञानदीप परीवार, मित्र परिवार,ग्रामस्थ यांचेही विशेष आभार मानले. सूत्रसंचालन श्री सचिन पोळ व आभार श्री विश्वनाथ पोळ यांनी मानले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा