श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर नो व्हेईकल झोन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (जि.मा.का.)
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात तसेच एकादशी दिवशी व आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री या चार यात्रा कालावधीत भाविक लाखोच्या संख्येने दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यातच मंदिर परिसरात चारचाकी ,दुचाकी वाहने आल्याने भाविकांना रहदारीस अडथळे निर्माण होतात.
आपत्कालीन परिस्थितीत मंदिर परिसरात ॲम्बुलन्स, अग्निशमन या वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. या अनुषंगाने चौफाळा ते महाद्वार (मंदिर परिसर) या परिसरात नो व्हेईकल झोन करावा. तसेच दर्शनाला येणारे मंत्रीमहोदय राज शिष्टाचार प्रमाणे अति महत्त्वाच्या व्यक्तींना शिवाजी चौक येथून मंदिर येथे घेऊन जाण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा. यासाठी मंदिर समितीने नव्याने इलेक्ट्रिक वाहने खरेदी करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत.
जेणेकरून भाविकांना गर्दीचा त्रास होणार नाही तसेच भाविकांना सुखकर दर्शन घेता येईल त्याचबरोबर व्हीआयपी दर्शनावर कडक निर्बंध लागू राहतील.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा