maharashtra day, workers day, shivshahi news,

अनवडी येथे विहीरीत सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान

वाई उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यासह भुईंज पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू

Unknown body in the well, wai, satara, shivshahi news, police,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

अनवडी येथे  विहीरीत सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी वाईच्या उपविभागीय पोलिस अधिकारीसह भुईंज पोलिसांसह धावाधाव सुरू असून मृतदेहाच्या  हातावरील ट्याटूसह घटनास्थळाची परीस्थिती खूनाचा संशय व्यक्त होत आहे.

सोमवारी सकाळी महामार्गावरील जोशिविहीर नजीक अनवडी ता.वाई येथे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका शेतकऱ्याचे विहिरीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला,घटनास्थळी भुईंज पोलीस टीम,सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे टीम,फॉरेन्सिक टीम यांच्या सह स्वतः वाईचे  उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम भुईंजचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे,पीएसआय, पतंग पाटील, सूरज शिंदे हे रात्रीउशिरापर्यंत ओळख पटवण्यासाठी धडपडत होते जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील त्या त्या ग्रुपवर शोध घेत होते परंतु मंगळवारी रात्री पर्यंत कोणीही चौकशी अथवा मिसिंग झालेले आले नाहीत परिसरातील सर्वच गावात दवंडी व आवाहन करून मृतदेह चा फोटो व ट्याटू दाखवून शोध घेण्याचा प्रयत्न झाला,

दरम्यान मृतदेह हा वय 25 ते 30 वर्षे असलेले तरुणांचा.   असावा व त्याचे अंगात फक्त जीन्स पॅंट व पोटावर बायडिंग तारेने बांधले होते त्यामुळे तो नक्कीच घातपात असावा असा पोलीस व वैद्यकीय सूत्रांचा अंदाज आहे तर भुईंज पोलिसांची तपास पथके परप्रांतीय कामगार,हॉटेल वेटर,अन्य कामातील तरुण कामगार या टॅटू चे माहिती आधारे शोध घेत आहेत, मंगळवारी रात्री या गुन्ह्याची अज्ञात इसमाचे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे,पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे करीत आहेत.

दरम्यान हातावर तीन स्टार काढलेली व्यक्ती कोणाच्या पहाण्यात असेल व ती गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असेल तर भुईंज पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांनी केले आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !